शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

उत्स्फूर्त बंद; शेतकऱ्यांसाठी अमरावतीकर एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 05:00 IST

 महाविकास आघाडीने सकाळी १० वाजता येथील राजकमल चौकात शेतकरीविरोधी कायदे व केंद्र शासनाचा निषेध करीत रॅली काढली. राजकमल चौक, गांधी चौक, जवाहर गेट, इतवारा बाजार, जयस्तंभ चौक ते इर्विन चौक या मार्गाने रॅली काढण्यात येऊन डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून  समारोप करण्यात आला. या रॅलीचे आयोजन महापालिकेचे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत व माजी महापौर विलास इंगोले यांनी केले होते.

ठळक मुद्देविविध राजकीय पक्षांचा, संघटनांचा सहभाग, चक्काजाम-निदर्शने, अत्यावश्यक वगळता दुपारपर्यंत सर्व सेवा ठप्प

  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकरी आंदोलनाचे समर्थनार्थ व केंद्र शासनाचे शेतकरीविरोधी कायदा हाणून पाडण्यासाठी विविध राजकीय पक्ष व संघटनांनी मंगळवारी पुकारलेल्या जिल्हा बंदला शहरात व ग्रामीण भागात उस्फूर्त प्रतिसाद लाभला. अत्यावश्यक वगळता सर्व सेवा दुपारपर्यंत ठप्प होत्या.  महाविकास आघाडीने सकाळी १० वाजता येथील राजकमल चौकात शेतकरीविरोधी कायदे व केंद्र शासनाचा निषेध करीत रॅली काढली. राजकमल चौक, गांधी चौक, जवाहर गेट, इतवारा बाजार, जयस्तंभ चौक ते इर्विन चौक या मार्गाने रॅली काढण्यात येऊन डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून  समारोप करण्यात आला. या रॅलीचे आयोजन महापालिकेचे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत व माजी महापौर विलास इंगोले यांनी केले होते. यामध्ये आमदार सुलभा खोडके, काँग्रेस जिल्हाध्यक्ष  बबलू देशमूख, माजी खासदार अनंत गुढे,  शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर बोरकर, सुरेखा ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, संगीता ठाकरे, हरिभाऊ मोहोड, शरद देवरणकर,  पराग गुडधे, राजेंद्र महल्ले, सुनील खराटे, नाना नागमोते, गटनेता भारत चौधरी, प्रशांत वानखडे, नीलेश गुहे, रिना नंदा, अविनाश मार्डीकर, प्रकाश बोंडे, संतोष महात्मे, ज्ञानेश्वर धाने पाटील,  नंदकिशोर शेरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. किसान संघर्ष समन्वय समितीद्वारा मंगळवारी सकाळी १० वाजता इर्विन चौकातून डाव्या आघाडीचे घटकपक्ष व काही सामाजिक संघटनांद्वारे निषेध रॅली काढण्यात आली. वंचित बहुजन आघाडी, आप, भाकप, माकप आदींचा यामध्ये सहभाग होता. यामध्ये तुकाराम भस्मे, अशोक सोनारकर, अलीम पटेल, सुभाष पांडे, सिद्धार्थ गायकवाड, जे.एम. कोठारी, चंद्रकांत बानुबाकोडे यांच्यासह विविध पक्षांचे पदधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

मुख्य बाजारपेठ बंदशेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व बंदला सहकार्य करण्यासाठी शहराच्या प्रमुख मार्गावरील सर्व मार्केट  बंद होते. मात्र, अंतर्गत भागातील काही दुकाने सुरु होती. सकाळी १२ पर्यंत ऑटोरिक्षा सेवा विस्कळीत झालेली होती. सिटीलॅन्ड, बिझिलॅन्ड व्यापारी संकुल बंद होते.

बस सेवा विस्कळीतबंददरम्यान महामंडळाची एकही बसही आगारातून सुटली नाही. काही संघटनांनी आंदोलनास सहकार्य करण्याचा ठराव केला होता. याव्यतिरिक्त अन्य आगारांतील बस सेवा बंद असल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली, खासगी ट्रॅव्हल्सदेखील सकाळपासून बंद होत्या.

नवीन कृषिकायद्यांना मराठा क्षत्रियांचा विरोधकेंद्र सरकारच्या नवीन कृषिकायद्यांना कडाडून विरोध दर्शवित पंजाब, हरियाणा येथील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला मराठा क्षत्रियांनी समर्थन जाहीर केले. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी निखील देशमुख, रामेश्वर कापसे, उत्तरा देशमुख, शीतल वाघमारे,  गौरव पवार आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपChakka jamचक्काजाम