बालवाडीच्या नावाखाली आध्यात्मिक केंद्र
By Admin | Updated: January 8, 2017 00:18 IST2017-01-08T00:18:38+5:302017-01-08T00:18:38+5:30
येथील मौजे राजापेठ परिसरातील सर्वे नं. २६/२ ही जागा महानगरपालिकेच्या मालकीची खुली जागा आहे.

बालवाडीच्या नावाखाली आध्यात्मिक केंद्र
क्रीडांगण बेपत्ता : अनधिकृत बांधकाम, खुल्या जागेत रस्ता
मनीष कहाते अमरावती
येथील मौजे राजापेठ परिसरातील सर्वे नं. २६/२ ही जागा महानगरपालिकेच्या मालकीची खुली जागा आहे. जागा जयराम नगर विकास समितीने बालवाडी चालविण्याकरिता मनपाकडून लिजवर घेतली.परंतु, त्या ठिकाणी बालवाडी ऐवजी स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्र सुरू आहे. त्यामुळे जयरामनगर मधील क्रिडांगणची जागा शिल्लक नाही. बेकायदेशीर ५ हजार फुटाचे पक्के बांधकाम केलेले आहे. मनपा काय कारवाई करते याकडे जयराम नगरवासीयांचे लक्ष लागले आहे.
मनपाची १३४ चौरस मीटर खुली जागा आहे. शासनाच्या धोरणानुसार तिथे बालवाडी, वाचनालय, व्यायाम शाळा आणि क्रीडांगण सुरू करता येते. परंतु, जयरामनगर विकास समितीने शासनाच्या नियमाला गुंडाळून ठेवून तिथे आध्यात्मिक केंद्र सुरू केले आहे. सन २००३ मध्ये जयरामनगर विकास समितीने बालवाडी सुरू करण्याकरिता मनपाकडे खुल्या भूखंडाची मागणी केली होती. त्यानुसार भूखंड देण्यात आला. जयरामनगर मध्ये ५५ घरे आणि ५ अपार्टमेट आहेत. परंतु, खुल्या जागेवरचा क्रीडांगण नाही. त्यामुळे लहान मुले रस्त्यावर खेळतात. अनेक छोटेमोठे अपघात ही झाले आहेत.
अध्यात्मिक केंद्राला चारही बाजूने भिंतीचे कम्पाउंड आहे. आतमध्ये भलामोठा हॉल आहे. समोर सिमेंटचा रस्ता आहे. फुलांचे झाडे आहेत. दोन खोल्यांचे पक्के बांधकाम आहे. एक चौकीदाराची खोली आहे.
२४ तास केंद्राचे गेट बंद राहते. त्यामुळे बाहेरील माणूस आतमध्ये प्रवेश करू शकत नाही. केवळ एकट्याची मालमत्ता झाली असल्याचा समज आहे. खेळाचे क्रिडांगण मनपा उपलब्ध केव्हा करून देणार याकडे जयरामनगरवासियांचे लक्ष लागले आहे.
नियमबाह्य बांधकाम असेल, तर पाडण्यात येईल. परवानगी बालवाडीकरिता दिली आहे.
- सु. पु. कांबळे, नगररचनाकार, मनपा, अमरावती