कर्मचाऱ्यांची रक्कम वळती करण्याच्या कामाला वेग

By Admin | Updated: October 3, 2015 00:21 IST2015-10-03T00:21:22+5:302015-10-03T00:21:22+5:30

अंशदायी निवृत्ती वेतन योजनेतील घोळ पाहून जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुधीर सूर्यवंशी चांगलेच संतापले.

The speed at which the workforce turns around | कर्मचाऱ्यांची रक्कम वळती करण्याच्या कामाला वेग

कर्मचाऱ्यांची रक्कम वळती करण्याच्या कामाला वेग

अंशदायी योजनेतील घोळ : विरोधी पक्षनेते संतापले
प्रदीप भाकरे अमरावती
अंशदायी निवृत्ती वेतन योजनेतील घोळ पाहून जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुधीर सूर्यवंशी चांगलेच संतापले. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देवून चौकशीची मागणी केली. मुख्य वित्त व लेखा अधिकाऱ्यांकडून वस्तुस्थिती जाणून घेतली. या प्रकरणाची चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
‘लोकमत’ने शुक्रवारी अंशदाय निवृत्ती योजनेचे कोट्यावधी रुपये गेले कुठे? या निर्षकाखाली जि.प. मधील सावळागोंधळ उघड केला. २ आॅक्टोबरची शासकीय सूटी असूनही या वृत्ताची जोरदार दखल घेण्यात आली. विरोधी पक्षनेत्यांसह वित्त सभापतीनी मुख्यवित्त लेखा अधिकाऱ्यांकडून नेमके काय घडले याबाबत माहिती घेतलीे. वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात अंशदान निवृत्ती योजनेची रक्कम जमा झाली नसल्याचे तथ्य ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी वित्त विभागातील आपल्या सहकाऱ्यांशी संपर्क साधून खात्यात रक्कम जमा आहे की नाही, हे जाणून घेतले. शनिवारी शेकडो कर्मचारी वित्त विभागामध्ये जावून खात्याची चौकशी करणार आहेत.
जिल्हा परिषदेत २००५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांची वेतनातून या योजनेंतर्गत १० टक्के कपात महिण्याकाठी करण्यात आली.
मात्र ही रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात वळती करण्यात आली नाही. त्यामुळे ही कोट्यवधीची रक्कम गेली कुठे? अशी शंका जि.प. कर्मचारी युनियनने उपस्थित केली होती.

चौकशीकरुन कारवाई करु, शासनाच्या नियमात राहुन काम न करणाऱ्या वित्त विभागाला जाब विचारु शनिवारी कॅफेलो पत्र देतो. माहिती मागवतो. वित्त व लेखाअधिकाऱ्यांचीच ही जबाबदारी आहे. वेळ पडल्यास उच्चस्तरावर तक्रार सुध्दा करु.
-सतीश हाडोळे,
उपाध्यक्ष तथा वित्त सभापती

असमर्थनीय चूक आहे. नोेंदी घेतल्या नाहीत. या घोळाला कर्मचारीच दोषी असून कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची केलेली ही दिशाभूल आहे. याबाबत शुक्रवारी सिईओं ना पत्र दिले आहे. जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
-सुधीर सूर्यवंशी,
विरोधी पक्षनेते, जि.प. अमरावती

Web Title: The speed at which the workforce turns around

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.