शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात दुष्काळ शुल्कमाफी प्रक्रियेला वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 18:05 IST

प्रवेशित विद्यार्थ्यांच्या यादीची चाचपणी : परीक्षा विभागाकडून प्राचार्यांना पत्र

अमरावती : राज्यात उद्भवलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर शासनाने दुष्काळग्रस्त भागासाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. त्याअनुषंगाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कदेखील माफ करण्याचे धोरण लागू केले आहे. उच्च व शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफी देण्यासंदर्भात कार्यवाही आरंभली आहे. प्राचार्यांना पत्र पाठवून दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत कळविले आहे.

२३ आॅक्टोबर २०१८ रोजी शासनाने खरीप हंगामातील ट्रीगर- २ लागू झालेल्या १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून काही सवलती लागू केल्या आहेत. यात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी ही सवलत समाविष्ट केली आहे. यात विद्यापीठे, तंत्रशिक्षण मंडळ आदींमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीची सवलत मिळणार आहे. त्यानुसार अमरावती विद्यापीठाने महसूल व वनविभागाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी देण्याकरिता युद्धस्तरावर कार्यवाही चालविली आहे. किंबुहना शासन निर्णयापूर्वी परीक्षा शुल्क आकारले असल्यास ती रक्कम परत करण्यासाठीची कार्यवाही महाविद्यालयांना करावी लागणार आहे. अमरावती विद्यापीठाने तालुकानिहाय महाविद्यालयांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीदेणेबाबत अवगत केले आहे. परीक्षा शुल्कमाफीचा लाभ किती विद्यार्थ्यांनी घेतला, ही आकडेवारी महाविद्यालयातून मागविली जाणार आहे. अमरावती विद्यापीठांतर्गत पाचही जिल्ह्यांत पाच लाखांचावर प्रवेशित विद्यार्थीसंख्या असून, दुष्काळसदृश तालुक्यांना याचा लाभ मिळेल, हे विशेष.

२८ तालुक्यांतील विद्यार्थ्यांना मिळणार लाभ अमरावती विद्यापीठांतर्गत पाचही जिल्ह्यांत जाहीर झालेल्या २८ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ मिळणार आहे. यात अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, चिखलदरा, मोर्शी, वरूड व अंजनगाव सूर्जी, बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, मोताळा व सिंदखेड राजा, अकोला जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शी टाकळी, मूर्तिजापूर, तेल्हारा, यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव, दारव्हा, कळंब, केळापूर, महागाव, मारेगाव, राळेगाव, उमरखेड व यवतमाळ तर वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यांचा समावेश आहे.

 

उच्च व शिक्षण सहसंचालकांकडून प्राप्त पत्रांचा आधार घेत दुष्काळग्रस्त भागातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले जाणार आहे. प्राचार्यांना तशा सूचना पत्राद्वारे देण्यात आल्या असून, खरीप हंगामातील दुष्काळसदृश तालुक्यांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.- हेमंत देशमुख,संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग

टॅग्स :droughtदुष्काळ