रेल्वे स्थानक चौकात रस्ते दुरुस्तीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:15 IST2021-03-09T04:15:44+5:302021-03-09T04:15:44+5:30
अमरावती : येथील रेल्वे स्थानक चौकात रस्ते दुरुस्तीला वेग आला आहे. रस्ते खोदून पाईपलाईन टाकली जात आहे. नालीचे सांडपाणी ...

रेल्वे स्थानक चौकात रस्ते दुरुस्तीला वेग
अमरावती : येथील रेल्वे स्थानक चौकात रस्ते दुरुस्तीला वेग आला आहे. रस्ते खोदून पाईपलाईन टाकली जात आहे. नालीचे सांडपाणी वाहून जावे, यासाठी भुयारी कामे युद्धस्तरावर होत आहे. मात्र, या विकासकामांमुळे वाहतुकीला खोळंबा निर्माण होत आहे. काही वेळा वाहतूक कोंडी होत आहे.
------------------
अकोला महामार्गावरील खड्डे बुजणार केव्हा?
अमरावती : बडनेरा ते लोणी दरम्यान अकोला महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना रस्ता पार करताना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
----------------------
आदिवासी नगरात नाल्या तुंबल्या
अमरावती : बडनेरा नवीवस्तीच्या आदिवासीगरातील नाल्या तुंबल्या आहेत. अंतर्गत रस्त्यांची दैना झाली असून, वाहने कशी चालवावी, हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. तुंबलेल्या नाल्यांमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नियमितपणे नाल्यांची सफाई करावी, अशी मागणी आहे.
--------------------------
विलासनगरातील रस्त्याची दैनावस्था
अमरावती : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लगतच्या विलासनगरातील मुख्य रस्त्याची दैनावस्था झाली आहे. रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी खड्डे पडले आहे. गत काही महिन्यांपूर्वीच या मार्गाचे निर्माणकार्य झाले. असे असताना लवकरच रस्ता उखडल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
-----------------------
दस्तुरनगर परिसरात घाणीचे साम्राज्य
अमरावती : दस्तुरनगर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नियमितपणे नाल्यांची सफाई होत नाही. अंतर्गत रस्त्यांची दैना झाली असून, खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. नाल्याची नियमितपणे सफाई करावी, अशी मागणी आहे.