हव्याप्र मंडळाचा नेत्रदीपक विजयादशमी उत्सव
By Admin | Updated: October 13, 2016 00:41 IST2016-10-13T00:41:22+5:302016-10-13T00:41:22+5:30
८६ वर्षांपासून भारतीय व्यायाम पद्धती व खेळांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवून देणाऱ्या

हव्याप्र मंडळाचा नेत्रदीपक विजयादशमी उत्सव
पारंपारिक खेळांसह विदेशी खेळांचे सादरीकरण : सर्व वयोगटातील खेळाडूंचा सहभाग
अमरावती : ८६ वर्षांपासून भारतीय व्यायाम पद्धती व खेळांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवून देणाऱ्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा दरवर्षीप्रमाणे यंदाही विजयादशमी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. स्थानिक दसरा मैदान येथे पार पडलेल्या या महोत्सवामध्ये भारतीय व्यायाम पद्धती, पारंपारिक खेळ व विदेशी खेळांसह कवायतींचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणामध्ये सर्वच वयोगटातील खेळाडूंचा सहभाग होता.
विजयादशमी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या व्यासपीठावर हव्याप्र मंडळाचे प्रधानसचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, जम्मू व काश्मिर राज्याचे उद्योगमंत्री चंदरप्रकाश गंगा, विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, मंडळाचे कोषाध्यक्ष सुरेशराव देशपांडे, मंडळाचे उपाध्यक्ष, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक श्रीकांत चेंडके, मंडळाच्या उपाध्यक्ष माधुरी चेंडके, मंडळाचे कार्याध्यक्ष रमेश गोडबोले, मंडळाचे उपाध्यक्ष सुरेश सावदेकर, प्राचार्य ए.बी.मराठे व श्रीलंका येथील विद्यापीठाचे कुलसचिव आदी उपस्थित होते. यानंतर विजयादशमी महोत्सवामध्ये सर्वच वयोगटातील खेळाडूंनी भारतीय पारंपारिक खेळांचे सादरीकरण केले. यामध्ये मल्लखांब, लाठीकाठी, योगासन, जिम्नॅस्टिक, एरोबिक्स, रशियन व स्वीडीश ड्रिल तसेच आंतरराष्ट्रीय खेळांचे चित्तथरारक सादरीकरण केले. (प्रतिनिधी)