२८ जूनला विशेष मतदार नोंदणी मोहीम

By Admin | Updated: June 26, 2015 00:36 IST2015-06-26T00:36:41+5:302015-06-26T00:36:41+5:30

मतदार याद्या शुद्धीकरण आणि प्रमाणिकरणाची प्रक्रिया निवडणूक आयोगाच्यावतीने सुरू करण्यात आली आहे.

Special Voter Registration Campaign on June 28 | २८ जूनला विशेष मतदार नोंदणी मोहीम

२८ जूनला विशेष मतदार नोंदणी मोहीम

अमरावती : मतदार याद्या शुद्धीकरण आणि प्रमाणिकरणाची प्रक्रिया निवडणूक आयोगाच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. २८ जून रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या मतदारांनी आपले नाव नोंदविले नाही किंवा वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांनी आपले नाव त्वरित यादीत नोंदवावे, असे आवाहन निवडणूक शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३१ जुलै २०१५ पर्यंत राष्ट्रीय मतदार याद्या अद्यावतीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत निरंतर प्रक्रियेतील अर्ज सहा, सात, आठ आणि आठ अ स्वीकारले जाणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत मतदार छायाचित्र ओळखपत्राच्या डेटाबेसशी मतदारांचा आधार क्रमांक जोडण्यात येणार आहे. दुबार, मय्यत झालेले तसेच स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. छायाचित्रातील चुका दुरुस्त करुन प्रमाणित मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत. आधार क्रमांक मतदार छायाचित्र ओळखपत्र डेटाबेसमध्ये भरण्यासाठी विविध कार्यपद्धतींचा उपयोग करता येणार आहे. मतदारांनी मतदार याद्या अद्ययावत कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते व निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी गजेंद्र बावणे यांनी केले आहे.
निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर सुविधा
निवडणूक आयोगाच्या ँ३३स्र//ीू्र.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर मतदार सेवा पोर्टलवर आधार क्रमांक व इतर माहिती भरता येणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या ँ३३स्र//ूीङ्म.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल संकेतस्थळावर 'अपलोड युवर आधार' या लिंकवर माहिती भरता येईल. १६६/५१९६९ या क्रमांकावर ीू३’्रल्ल‘ स्पेस एपीक क्रमांक स्पेस आधार क्रमांक याप्रमाणे एसएमएस करता येईल. ई-मेल निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात येत असलेल्या मोबाईल 'अ‍ॅप'साठी १९५० या क्रमांकावर संपर्क करुन डेटाबेस भरता येईल किंवा प्रपत्र अ मध्ये माहिती भरुन ती आधार क्रमांक आणि मतदार छायाचित्र ओळखपत्राच्या छायाचित्रासह सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील मतदार केंद्रात जमा करता येणार आहे.

Web Title: Special Voter Registration Campaign on June 28

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.