पंढरपूर विशेष रेल्वेगाडी आजपासून
By Admin | Updated: June 28, 2017 00:15 IST2017-06-28T00:15:26+5:302017-06-28T00:15:26+5:30
दरवर्षीप्रमाणे यंदाही विठ्ठल भक्तांना पंढरपूरकडे ये-जा करणे सोईचे व्हावे, यासाठी मध्य रेल्वेने अमरावती- पंढरपूर विशेष रेल्वे गाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंढरपूर विशेष रेल्वेगाडी आजपासून
अमरावती : दरवर्षीप्रमाणे यंदाही विठ्ठल भक्तांना पंढरपूरकडे ये-जा करणे सोईचे व्हावे, यासाठी मध्य रेल्वेने अमरावती- पंढरपूर विशेष रेल्वे गाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी पंढरपूरसाठी बुधवारी २८ जून रोजी नया अमरावती रेल्वे स्थानकाहून रवाना होणार आहे. एकूण २० डब्याच्या विशेष रेल्वे गाडीने भक्तांनी तिकिट घेवूनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे विभागाने केले आहे.
नया अमरावती रेल्वे स्थानकाहून २८, ३० जून त्यानंतर १, २ जुलै रोजी दुपारी २ वाजता पंढरपूरकडे रवाना होईल. तसेच पंढरपूर रेल्वे स्थानकावरुन २९, ३० जून तर १ व २ जुलै रोजी १० वाजून ४० मिनीटांनी अमरावतीसाठी रवाना होईल. पंढरपूर विशेष रेल्वे गाडीला बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदूरा, मलकापूर, बोदवड, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, खामगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, भिगाव, जेजूर, खुर्दवाडी, पंढरपूर असे थांबे देण्यात आले आहे. ही गाडी २० डब्याची असून यात १८ डबे सामान्य व आरक्षण तर दोन डबे एसएलआरचे राहतील. ही विशेष गाडी विठ्ठल भक्तांच्या सोयीसाठी असून तिकिट घेवूनच प्रवास करावा लागेल, अन्यथा विनातिकिट प्रवास केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई किंवा जेलमध्ये रवानगी केलीे जाईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.