विशेष व्याघ्र संरक्षण दल, वन निरीक्षक भरती

By Admin | Updated: July 6, 2015 00:16 IST2015-07-06T00:16:46+5:302015-07-06T00:16:46+5:30

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत विशेष व्याघ्र संरक्षण दल स्थापनेसाठी सरळसेवा वनरक्षक आणि वननिरीक्षक भरती प्रक्रिया ७ जुलैपासून सुरु होत आहे.

Special Tiger Conservation Force, Forest Inspector Bharti | विशेष व्याघ्र संरक्षण दल, वन निरीक्षक भरती

विशेष व्याघ्र संरक्षण दल, वन निरीक्षक भरती

७ जुलैपासून धावचाचणी : चिखलदरा, धारणी तालुक्याला प्राधान्य
अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत विशेष व्याघ्र संरक्षण दल स्थापनेसाठी सरळसेवा वनरक्षक आणि वननिरीक्षक भरती प्रक्रिया ७ जुलैपासून सुरु होत आहे. पुरुष ५ तर महिलांसाठी ३ कि.मी. धावचाचणी घेतली जाणार आहे.
सरळसेवा वनरक्षक भरती प्रक्रियेत ज्या उमेदवारांचे आॅनलाईन पद्धतीने अर्ज प्राप्त झाले आहेत, अशा उमेदवारांची धावचाचणी घेतली जाईल. नागपूर राष्ट्रीय महा मार्गालतच्या औद्योगिक वसाहत, नांदगाव पेठ परिसरात धावचाचणी होणार आहे. पुरुष उमेदवारांसाठी ७ व ८ जुलै तर महिला उमेदवारांसाठी ९ जुलै ही तारीख निश्चित झाली आहे. यावेळी ओळखपत्र अनिवार्य असून ते संकेतस्थळावर उपलब्ध आहे. धावचाचणीत आवश्यक पोषाख, बूट व अन्य अनुषंगिक साहित्य आणण्याची सूचना उमेदवारांना देण्यात आली आहे. ओळखपत्रासोबत शारीरिकदृष्ट्या सदृढ असल्याचे प्रमाणपत्र वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आणणे अनिवार्य आहे. ओळखपत्रात नमूद तारीख व वेळेनुसार उमेदवार हजर न राहिल्यास चाचणीत सहभागी होता येणार नाही, असे मुख्य वनसंरक्षक संजीव गौड यांनी सांगितले आहे. उमेदवारांना धावचाचणीनंतर भरती प्रक्रियेची माहिती संकेस्थळावर उपलब्ध होईल, असे वनविभागाने कळविले. ८१ वनरक्षकांच्या जागांची भरती प्रक्रिया राबविली जात आहे. चिखलदरा, धारणी तालुक्यातील स्थानिकांना यात प्राधान्य दिले जात आहे. तसेच वननिरिक्षकांच्या २७ जागा सरळसेवा भरती प्रक्रियेतून भरली जात आहे. यामध्ये आठ महिला, एक प्रकल्पग्रस्त अथवा धरणग्रस्त, भूकंपग्रस्त एक, माजी सैनिक चार, गुणवत्ता धारक खेळाडू एक, होमगार्ड एक, अंशकालीन तीन, रोजंदारी वनमजूर तीन तर सर्वसाधारण पाच असे एकूण २७ उमेदवारांची भरती प्रक्रियेतून वननिरीक्षकांची निवड केली जाईल.

शासन निर्णयानुसार ही भरती प्रक्रिया राबवलिी जात आहे. उमेदवारांना संकेतस्थळावर आवश्यक ती माहिती पुरविण्यात आली आहे. धावचाचणी घेण्याची तयारी पूर्ण झाली असून वनविभागाने इतर विभागाचे सहकार्य घेण्याचे ठरविले आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात वननिरीक्षक, वनरक्षक सरळसेवा पदाची भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
- नीनू सोमराज,
उपवनसंरक्षक, अमरावती.

Web Title: Special Tiger Conservation Force, Forest Inspector Bharti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.