दिवाळीसाठी विशेष सुपरफास्ट रेल्वे गाड्या सुरू

By Admin | Updated: October 17, 2016 00:08 IST2016-10-17T00:08:11+5:302016-10-17T00:08:11+5:30

दिवाळीनिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे विभागाने सोमवार १७ पासून सुपरफास्ट वातानुकुलित विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Special super fast train trains for Diwali | दिवाळीसाठी विशेष सुपरफास्ट रेल्वे गाड्या सुरू

दिवाळीसाठी विशेष सुपरफास्ट रेल्वे गाड्या सुरू

पुण्यासाठी विशेष गाड्या : प्रवाशांची होणार सोय
बडनेरा : दिवाळीनिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे विभागाने सोमवार १७ पासून सुपरफास्ट वातानुकुलित विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यात अमरावती ते पुणे ये-जा करणाऱ्या प्रवाशांना विशेषत्वाने लाभ होणार आहे.
उदना-अमरावती विशेष रेल्वेगाडी क्रमांक ०९०२५ ही १७ आॅक्टोबर रोजी उदन्याहून निघेल उशिरा रात्री अमरावतीत पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा उदन्याकडे निघेल. प्रत्येक सोमवारी उदन्याहून-अमरावतीसाठी पाच फेऱ्या एक महिन्याच्या अवधीत होतील. त्याचप्रमाणे १८ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता हीच गाडी अमरावतीहून-उदना येथे जाईल. या गाडीच्या देखिल महिनाभरात ५ फेऱ्या होणार आहेत. तसेच अमरावती-पुणे ही विशेष सुपरफास्ट वातानुकुलित रेल्वेगाडी सुद्धा सोडण्यात येणार आहे. ही गाडी पुण्याहून बुधवार १९ रोजी अमरावतीसाठी रवाना होईल. ती गाडी पुण्याहून दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी निघेल. दुसऱ्या दिवशी म्हणजे २० आॅक्टोबरला गुरूवारी हिच गाडी दुपारी १२.४५ वाजता पुण्यासाठी निघेल. खा. अडसूळ यांच्या हस्ते या विशेष गाडीला हिरवी झेंडी दाखविण्यात येईल. या गाडीच्या पाच फेऱ्या प्रत्येक बुधवारी पुण्याहून तर पाच फेऱ्या प्रत्येक गुरुवारी अमरावती रेल्वेस्थानकाहून होणार असल्याची माहिती रेल्वेचे वाणिज्य निरीक्षक कुंभारे यांनी दिली. दिवाळीच्या पार्श्वभूमिवर हा निर्णय घेतला आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Special super fast train trains for Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.