खाते वाटपासाठी ७ नोव्हेंबरला विशेष सभा
By Admin | Updated: October 25, 2014 22:33 IST2014-10-25T22:33:16+5:302014-10-25T22:33:16+5:30
जिल्हा परिषदेच्या नवीन पदाधिकाऱ्यांना खातेवाटपाचा मुहूर्त जिल्हा परिषद प्रशासनाने काढला आहे. येत्या ७ नोव्हेंबर रोजी यासाठी विशेष सभा जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात होणार आहे.

खाते वाटपासाठी ७ नोव्हेंबरला विशेष सभा
जिल्हा परिषद : उपाध्यक्षांसह दोन सभापतींना मिळणार जबाबदारी
अमरावती : जिल्हा परिषदेच्या नवीन पदाधिकाऱ्यांना खातेवाटपाचा मुहूर्त जिल्हा परिषद प्रशासनाने काढला आहे. येत्या ७ नोव्हेंबर रोजी यासाठी विशेष सभा जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात होणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतीश उईके, महिला व बालकल्याण समिती सभापती वृषाली विघे, समाजकल्याण सभापती सरिता मकेश्वर आदी पदाधिकारी वगळता उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, सभापती अरूणा गोरले या तीन पदाधिकाऱ्यांना विशेष सभेत खातेवाटप होणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच चार जिल्हा परिषद सभापतींची निवडणूक विधानसभेच्या धामधुमीत आटोपली. मात्र, याचवेळी निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे जिल्हा परिषदेतील नवीन शिलेदारांना यावेळी खातेवाटप होऊ शकले नव्हते. त्यामुळे उपाध्यक्ष, महिला व बालकल्याण समिती सभापती, समाजकल्याण सभापती आदींची समिती सभापती पदासाठी निवडणूक पार पडल्यामुळे याचा अपवाद सोडल्यास आता उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, सभापती अरूणा गोरले या तीन जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना विशेष सभेतून सध्या अस्तित्वात असलेल्या वित्त व शिक्षण, कृषी व पशुसंर्वधन, आणि बांधकाम या तीन खात्याचे वाटप होणार आहे. (प्रतिनिधी)