-आता विशेष विवाह नोंदणी झाली आॅनलाईन
By Admin | Updated: September 11, 2016 00:11 IST2016-09-11T00:11:55+5:302016-09-11T00:11:55+5:30
विवाहेच्छुकांना विशेष विवाह कायद्यानुसार विवाह नोंदणीसाठी शासकीय कार्यालयांमध्ये करावी लागणारी पायपीट थांबली आहे.

-आता विशेष विवाह नोंदणी झाली आॅनलाईन
आधार लिंक अनिवार्य : पायपीट थांबली
अमरावती : विवाहेच्छुकांना विशेष विवाह कायद्यानुसार विवाह नोंदणीसाठी शासकीय कार्यालयांमध्ये करावी लागणारी पायपीट थांबली आहे. विवाह नोंदणीसाठी आता आॅनलॉईन नोंदणी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. गत चार महिन्यांत जिल्ह्यात २५५ जोडप्यांनी आॅनलाईन विवाह नोंदणीचा लाभ घेतल्याची माहिती आहे.
यापूर्वी विवाह नोंदणीची पद्धत ही वेळकाढू होती. त्यामुळे विवाह इच्छुकांना कागदपत्रांची पूर्तता करताना दमझाक व्हायची. मात्र आता विशेष विवाह नोंदणी कायद्यान्वये आधार लिंकिंग करून आॅनलॉईन विवाह नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे वधू-वरांना थेट लग्नासाठीच विवाह नोंदणी कार्यालयात थेट जावे लागणार आहे. या पारदर्शक प्रणालीमुळे विवाहेच्छुकांना शासकीय कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे बंद झाले आहे. विवाह नोंदणी पद्धतीमुळे वधू- वरांना विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन पूर्वी नोंदणी करावी लागत होती. त्यानंतर मिळालेल्या तारखेत सदर कार्यालयात उपस्थित राहून ‘लगीनघाई’ करावी लागत होती. त्यामुळे वधू-वरांना विवाह नोंदणी कार्यालयात किमान दोन वेळा येरझारा माराव्या लागत होत्या. यामुळे अनेक अडचणींना सामारे जावे लागत होते. दरम्यान विवाह नोंदणी अर्ज भरणारे दलाल, वेळेपूर्वी विवाह नोंदणी करून देण्याचे आमीष देऊन वधू-वरांची आर्थिक फसवणूक व्हायची. परंतु आता विशेष विवाह नोंदणी कायद्यामुळे पारदर्शकता आणली गेली आहे. त्यामुळे दलालांकडून होणारी फसवणूक थांबली आहे. वधू-वरांना विवाह नोंदणी सुलभ व्हावी, यासाठी शासनाच्या नोंदणी व मुंद्राक शुल्क विभागाने विवाहासाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. विवाह नोंदणीसाठी कार्यालयात ये- जा करण्याची भानगड संपुष्टात आली आहे. घरूनच विवाह नोंदणी करता येणार आहे. यापूर्वी विवाह नोंदणी करताना कागदपत्रांची पूर्तता, गुंतागुंत बंद करण्यात आली आहे. मे २०१६ पासून विशेष विवाह नोंदणी सुरु झाली आहे. (प्रतिनिधी)
१९५४ च्या कायद्यानुसार वधू-वरांना लाभ
विशेष विवाह नोंदणी करण्याची संधी ही राज्य शासनाच्या मुंद्राक व शुल्क विभागाने १९५४ च्या कायद्यानुसार वधू-वरांना उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत या कायद्यानुसार जिल्ह्यात २५५ जोडप्यांनी विशेष विवाह कायद्याचा लाभ घेतल्याची माहिती आहे. ३ मे २०१६ पासून विशेष विवाह नोंदणी केली जात आहे.
आॅनलाईन विवाह नोंदणी करणाऱ्या वधू-वरांना कलम ५ नुसार नोटीस बजावून कागदपत्रांसह विवाह नोंदणीसाठी बोलाविले जाते. दोन साक्षीदार, आधार कार्ड हे अनिवार्य असून नोंदणीनंतर ६० दिवसांच्या आत विवाह करणे बंधनकारक आहे.
- अशोक धुळे,
दुय्यम निबंधक, अमरावती