विशेष पोलीस महानिरीक्षकांची नांदगावच्या शिवालयास भेट

By Admin | Updated: August 6, 2016 00:04 IST2016-08-06T00:04:07+5:302016-08-06T00:04:07+5:30

येथील साडेसातशे वर्षांपूर्वीच्या पुरातन शिवालयात श्री खंडेश्वर मंदिरास विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी भेट दिली...

Special Inspector General of Police visited the campus of Nandgaon | विशेष पोलीस महानिरीक्षकांची नांदगावच्या शिवालयास भेट

विशेष पोलीस महानिरीक्षकांची नांदगावच्या शिवालयास भेट

पुरातन मंदिर : साडेसातशे वर्षांचा इतिहास
नांदगाव खंडेश्वर : येथील साडेसातशे वर्षांपूर्वीच्या पुरातन शिवालयात श्री खंडेश्वर मंदिरास विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी भेट दिली व प्राचीन इतिहास जाणून घेतला. त्यांच्या समवेत उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीनिवास घाडगे, ठाणेदार अमित वानखडे हे होते.
श्रावण मासात हजारो भाविक या पुरातन शिवालयामध्ये दर्शनासाठी येतात. हे शिवालय मुनिचे साधनास्थळ असल्याने या शिवालयास विशेष महत्व प्राप्त झाले आहे. तसेच या शिवालयात नृसिंह अवताराची दुर्मिळ मुर्ती आहे. पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव हे नांदगाव पोलीस ठाण्याला भेट देण्यासाठी आले होते. तेथे त्यांनी वृक्षारोपण केले. नंतर वाटेतच हे पुरातन शिवालय असल्याने येथे येऊन त्यांनी मंदिराचीही पाहणी केली. तसेच मंदिरावरील वास्तुशिल्प पुरातन शिवलिंग; शिवपार्वतीची मुर्ती नृसिंह अवताराची मूर्ती व मंदिराच्या दगडी भिंतीवरील शिलालेख इत्यादींची माहिती जाणून घेतली.
यावेळी खंडेश्वर संस्थानचे अध्यक्ष प्रकाश जाधव, सचिव नारायण, राव वैष्णव यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी संस्थानचे विश्वस्त संजय जेवडे, विष्णू रावेकर, पुजारी दिवाकर लांडगे नानाजी चांदूरकर, आदि नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Special Inspector General of Police visited the campus of Nandgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.