नांदगावात सोयाबीनची आवक घटली

By Admin | Updated: December 14, 2015 00:21 IST2015-12-14T00:21:10+5:302015-12-14T00:21:10+5:30

कधी काळी या महिन्यात विक्रीस विक्रमी आवक राहणाऱ्या येथील बाजार समितीमधील सोयाबीनची आवक आता घटली असून त्यावर उत्पादन घटीचा परिणाम जाणवत आहे.

Soybean in arrivals decreased in Nandgaon | नांदगावात सोयाबीनची आवक घटली

नांदगावात सोयाबीनची आवक घटली

उत्पादन घटीचा परिणाम : ९ महिन्यांत १२ शेतकरी आत्महत्या
नांदगाव खंडेश्वर : कधी काळी या महिन्यात विक्रीस विक्रमी आवक राहणाऱ्या येथील बाजार समितीमधील सोयाबीनची आवक आता घटली असून त्यावर उत्पादन घटीचा परिणाम जाणवत आहे. यंदा अपुऱ्या पावसामुळे सोयाबीनचा हंगाम बुडाला. कित्येकांना एकरी फक्त एक ते दोन पोते सोयाबीनचे उत्पादन झाले तर काही शेतकऱ्यांना शेतातील सोयाबीन सोंगण्याचे काम पडले नाही. त्यामुळे यंदा भीषण दुष्काळाचे संकट कोसळले आहे. येथील शेतकऱ्यांचे मुख्य पीक सोयाबीन असून या पिकांच्या भरवशावर त्याच्या प्रपंचाचा गाडा चालतो. पण दुष्काळामुळे या शेतकऱ्यांचा गाडा आर्थिक गर्तेत सापडला आहे.
नांदगाव खंडेश्वर बाजार समितीत सन २०१२-२०१३ च्या हंगामात डिसेंबर मध्ये सन २०१३-२०१४च्या डिसेंबर महिन्यात पंधराशे पोत्यांची आवक होती. सन २०१४-२०१५च्या डिसेंबरमध्ये चौदाशे पोत्याची आवक होती. यंदा याच महिन्यात ्फक्त पाचशे ते तीनशे पोत्यांची विक्री आवक असून इतकी घट झाली आहे. यावरुन दुष्काळाचे चित्र स्पष्ट होते. सध्या सोयाबीनला तीन हजार पाचशे रुपये प्रतीक्विंटल भाव आहे.

शेतकरी आत्महत्या चिंताजनक
नऊ महिन्यांत १८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात. यातील ११ शेतकरी आत्महत्या शासनाने पात्र ठरविल्यात. यात १३ एप्रिल २०१५ ला निंभोरा लाहे येथील भाष्कर ढोरे, १५ एप्रिलला शिवणी येथील नामदेव वैद्य, २१ एप्रिल जावरा येथील प्रतापसिंग झाकर्डे, २१ मे २०१५ रोजी शिवरा येथील दादाराव काळबांडे, ८ जुलै रोजी २०१५ ला खेडपिंप्री येथील रुपराव शिरकरे, १५ जुलै २०१५ पापळ येथील अजय खरीपकर, ८ आॅगस्ट २०१५ ला खेडपिंप्री येथील रुपराव शिरकरे, आॅगस्ट २०१५ ला जनुना येथील दुर्जनसिंंग चंदेल, १९ आॅगस्ट रोजी सालोड येथील संजय इंझळकार, १८ सप्टेंबर रोजी टाकळी येथील अशोक वऱ्हेकर, १९ सप्टेंबरला खानापूर येथील नारायण पंशीरे, २९ सप्टेंबर अडगाव येथील रवी गजभिये, ३ डिसेंबरला फुबगाव येथील विजय राऊत यांनी कर्जापायी आत्महत्या केली आहे.

यंदाचा दुष्काळ मागील तीन वर्षांच्या तुलनेत भयावह आहे. शासनाने याकडे लक्ष दिले नाही, तर शेतकरी आत्महत्या वाढेल. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव व त्वरित नुकसानभरपाईची आर्थिक मदत द्यावी.
- विलास चोपडे,
सभापती,
बाजार समिती, नांदगाव.

Web Title: Soybean in arrivals decreased in Nandgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.