अवकाळीने भिजले बाजार समितीमधील सोयाबीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 22:12 IST2017-10-12T22:12:38+5:302017-10-12T22:12:53+5:30
बाजार समितीत सध्या नवीन सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर आवक होत असताना नियोजन नसल्याचा फटका शेतकºयांनाच बसत आहे.

अवकाळीने भिजले बाजार समितीमधील सोयाबीन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बाजार समितीत सध्या नवीन सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर आवक होत असताना नियोजन नसल्याचा फटका शेतकºयांनाच बसत आहे. शेडमध्ये व्यापाºयांचा माल असल्याने उघड्यावर ठेवलेले शेतकºयांचे सोयाबीन गुरूवारी दुपारी अवकाळीच्या पावसाने भिजले. यामुळे शेतकºयांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
यंदाच्या खरिपाच्या सोयाबीनचा हंगाम सुरू झाल्याने बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीनची आवक वाढली आहे. गुरूवारी सात हजार ६६४ पोत्यांची आवक झाली. आठ दिवसांवर दिवाळी आली असल्याने अडचणीत असलेला शेतकरी काढणीनंतर सोयाबीन लगेच विक्रीसाठी आणत आहे. मात्र बाजार समित्यांमध्ये शेडमध्ये व्यापाºयांचा माल आहे. कित्येक दिवसापासून व्यापाºयांनी मालाची उचल न केल्यामुळे शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेले सोयाबीन उघड्यावर ठेवावे लागले व आलेल्या पावसामुळे गंजीतील सोयाबीन वाहून गेले, तर पोत्यातील सोयाबीन भिजले. पुरेशा प्रमाणात ताडपत्री नसल्यामुळे अनेक शेतकºयांचा शेतमाल भिजल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.
शहरात सोमवारी दुपारनंतर अतिवृष्टीमुळे खोलगट भागातील घरांत पाणी घुसले तसेच अंबा नालादेखील ओसंडून वाहल्याने अनेक घरात पाणी घुसले होते. यामधून सावरत नाही तोच गुरूवारी दुपारी ३ नंतर मुसळधार पाऊस पडला. यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.