शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

एका पावसाने जाणार का सोयाबीन पीक ?

By admin | Published: August 24, 2016 12:02 AM

रावर : १६ दिवसांपासून पावसात खंड, शेतकरी चिंताग्रस्त अमरावती : जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या ४० टक्के असणारे सोयाबीन पीक फुलोरावर व काही ठिकाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे.

पीक फुलोरावर : १६ दिवसांपासून पावसात खंड, शेतकरी चिंताग्रस्त अमरावती : जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या ४० टक्के असणारे सोयाबीन पीक फुलोरावर व काही ठिकाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. या स्थितीमध्ये सोयाबीनला पावसाची नितांत आवश्यकता असताना १६ दिवसांपासून पावसात खंड पडला आहे. याचा थेट परिणाम उत्पन्नावर होणार आहे. त्यामुळे एका पावसाने पीक हातचे जाणार का, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक १२६.६ टक्के पाऊस पडला. सतत पोषक पाऊस असल्याने पिकांची वाढदेखील समाधानकारक आहे. सद्यस्थितीत सोयाबीन पीक बहरावर व काही ठिकाणी शेंगा भरण्याच्या स्थितीत आहे. यावेळी सोयाबीनला पावसाची आवश्यकता असते. यामुळे शेंगामधील दाणे भरतात. पाऊस नसला तर शेंगादेखील पोचट होतात. यंदा अधिक पाऊस असल्याने चोपन व काळ्या जमिनीत आर्द्रता आहे. मात्र, मध्यम व हलक्या स्वरूपाच्या जमिनीतील पिकांना पावसाची आवश्यकता आहे. मात्र, जिल्ह्यात ७ आॅगस्टपासून पावसात खंड आहे. त्यामुळे संरक्षित सिंचनाची सुविधा असणारे शेतकरी पाण्याची पाळी देऊ शकतात. मात्र, जिरायती क्षेत्रात पावसाच्या ताणासाठी वेळीच व्यवस्थापन करण्याची गरज आहे. यंदाच्या खरीप हंगामात २ लाख ८९ हजार २१२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. ही ८९.५ टक्केवारी आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात १५ हजार ४२० हेक्टर, अचलपूर १४ हजार ३०, चांदूरबाजार १६ हजार २००, धामणगाव १८ हजार २३, चांदूररेल्वे २७ हजार ३३५, तिवसा २२ हजार ९१४, मोर्शी १९ हजार ५७७, वरुड २ हजार ८०, दर्यापूर १४ हजार २४३, धारणी ९ हजार ९३०, चिखलदरा ११ हजार ५४३, अमरावती ३८ हजार ९६०, भातकुली २८ हजार ६७९ व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ५० हजार २७८ हेक्टर क्षेत्रात सोयाबिनची पेरणी आहे.(प्रतिनिधी)चक्रभुंगा किडीसाठी उपाययोजना सोयाबीन पिकात फुलोरापूर्वी ३.५ वक्रभुंगा प्रतीलिटर ओळीत आढळल्याबरोबर प्रोफेनोफॉस ५० ई.सी.२० मिली किंवा थायक्लोप्रिड २१.७ एससी १५ मिली किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के १२.५ मिली किंवा एथिओन ५० ई.सी. १५.३० मिली किंवा क्लोरत्र्यनिलीप्रोल १८.५ एससी ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन प्रादेशिक संशोधन केंद्राचे कृषीतज्ज्ञ मंगेश दांडगे, योगेश इंगळे व केंद्राचे प्रमुख संजय साखरे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.अशी करावी उपाययोजना वाढवृद्धी किंवा फुलोरावृद्धी रासायने ही कीटकनाशके/बुरशीनाशके व तत्सम रसायनांमध्ये एकत्रित करून फवारणी करू नये, यापासून पिकांना अपाय होण्याची शक्यता अधिक असते. सद्यस्थितीत पावसाचा खंड पडल्याने पिकांना पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी पोटाशियम नायट्रेट १% (१ किलो १०० लीटर पाणी) या बाष्परोधकाची फुलोरावर १५ दिवसांनी फवारणी करावी. पावसाचा खंड पडल्यास आधी ओलीत पिके फुलोऱ्यावर असताना व दुसरे ओलीत दाणे भरत असताना करावे. खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास एथिओन ५० इसी १५ ते ३० मिली किंवा इंडोक्सिकॅर्ब १५.८ एसी ६.६ मिली किंवा क्लोरत्र्यनिलीप्रोल १८.५ एसीसी ३ मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.७ आॅगस्टपासून पावसाचा खंडसोयाबीन हे पावसासाठी अतिसंवेदनशील पीक आहे. यात ७ आॅगस्टपासून आजपर्यंत म्हणजे १६ दिवस पावसाचा खंड असल्याने मध्यम व हलक्या स्वरुपाच्या जमिनीतील पीक धोक्यात आले आहे.