लॉकडाऊनमध्ये शिथिलता येताच शहर गजबजले, गर्दी पुन्हा कायम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:10 IST2021-06-03T04:10:46+5:302021-06-03T04:10:46+5:30

फोटो - पी ०२ वरूड वरूड : राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता लॉकडाऊन सुरू केला होता. हॉटस्पॉटमध्ये कडक निर्बंधांची ...

As soon as the lockdown slows down, the city is buzzing, the crowd continues again! | लॉकडाऊनमध्ये शिथिलता येताच शहर गजबजले, गर्दी पुन्हा कायम !

लॉकडाऊनमध्ये शिथिलता येताच शहर गजबजले, गर्दी पुन्हा कायम !

फोटो - पी ०२ वरूड

वरूड : राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता लॉकडाऊन सुरू केला होता. हॉटस्पॉटमध्ये कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू होती. यामुळे नागरिकांचा व्यवसाय ठप्प झाल्याने शासनाने कोरोना निर्बंध शिथिल करून सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सर्व दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली. मात्र, एकाचवेळी नागरिक बाहेर पडल्याने पुन्हा शहरातील रस्ते गजबजले असून, सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. भाजीपाला मार्केटमध्ये पुन्हा नागरिकांची गर्दी कायम झाल्याने कोरोनाचे भय कुणालाही उरले नसल्याचे चित्र आहे. प्रशासकीय यंत्रणा काटेकोर नियमाचे पालन करण्याचे आवाहन करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रयत्न करीत आहे. परंतु, नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. यामुळे वरूड तालुक्यात पुन्हा कोरोनाचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नागरिकांनी वेळीच सावध राहून घरातच राहावे, सोशल डिस्टन्स पाळावे आणि विनाकारण घराबाहेर येऊ नये, असे आवाहन तालुका व्यवस्थापन समिती, नगर परिषद प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, पंचायत समितीच्यावतीने करण्यात येत आहे.

Web Title: As soon as the lockdown slows down, the city is buzzing, the crowd continues again!