अमरावतीत ‘सोन्या’चा कचरा, पर्यावरणाचा ऱ्हास
By Admin | Updated: October 5, 2014 22:54 IST2014-10-05T22:54:54+5:302014-10-05T22:54:54+5:30
दसरा नुकताच आटोेपला आहे. विजयादशमीच्या या सणानिमित्त आपट्याची पाने एकमेकांना देऊन शुभेच्छा देण्याची पूर्वापार परंपरा आहे. त्यासाठी दसऱ्याच्या दोन दिवस आधीच शहरात ग्रामीण भागातून आपट्याची

अमरावतीत ‘सोन्या’चा कचरा, पर्यावरणाचा ऱ्हास
वैभव बाबरेकर -अमरावती
दसरा नुकताच आटोेपला आहे. विजयादशमीच्या या सणानिमित्त आपट्याची पाने एकमेकांना देऊन शुभेच्छा देण्याची पूर्वापार परंपरा आहे. त्यासाठी दसऱ्याच्या दोन दिवस आधीच शहरात ग्रामीण भागातून आपट्याची पाने विक्रीसाठी येतात. ‘सोने’म्हणून दिले जाणारे आपट्याचे पानं दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शहरातील रस्त्यांवर अस्तव्यस्त पडलेले होते. त्यामुळे ‘शहरात सोन्याचा कचरा’ झालाय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एकीकडे शासन पर्यावरण रक्षणासाठी अनेक योजना राबविते. परंतु परंपरेच्या नावाखाली होणारी आपट्याच्या वृक्षांची कत्तल रोखण्यासाठी मात्र कोणत्याच उपाययोजना केल्या जात नाहीत. रावणाचा वध करून श्रीराम अयोध्येत परतले. तो विजयाचा दिवस म्हणून ‘विजयादशमी’ साजरी केली जाते. त्या दिवशी दसरा साजरा केला जातो.