लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अवघ्या १०० रुपयांसाठी पोटच्या मुलाने वडिलांची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गोपालनगर भागातील शिवनेरी कॉलनीलगतच्या मत्स्यगंधा कॉलनी परिसरात घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मनोहर मधुकर बोरकर (५५) असे मृताचे नाव आहे. गुरुवारी सकाळी ही घटना उघड झाली. राजापेठ याप्रकरणी पोलिसांनी मृताचे वडील मधुकर सखाराम बोरकर (८६) यांच्या तक्रारीवरून मृताचा मुलगा यशवंत ऊर्फ राहुल मधुकर बोरकर (३०) याच्याविरुद्ध १३ मार्च रोजी दुपारी १२:३३ च्या सुमारास खुनाचा गुन्हा दाखल केला तथा आरोपीला तातडीने अटक केली.
एफआयआरनुसार, ८६ वर्षीय मधुकर बोरकर हे आपली पत्नी, मुलगा मनोहर आणि नातू यशवंत ऊर्फ राहुल यांच्यासह वास्तव्यास आहेत. नातू यशवंत याला दारूचे प्रचंड व्यसन असून, तो कोणत्याही प्रकारचा कामधंदा करत नव्हता. १३ मार्च रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास यशंवतने त्याचे वडील मनोहर यांच्याकडे दारू पिण्यासाठी १०० रुपयांची मागणी केली. मात्र, मनोहर यांनी पैसे देण्यास नकार दिला. याच कारणावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. भांडण विकोपाला गेल्यावर संतापलेल्या यशवंतने घराच्या अंगणात पडलेली लाकडी बल्ली उचलून वडील मनोहर यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. एवढ्यावरच न थांबता त्याने लोखंडी पावशीने त्यांच्या हातावर आणि पायावरही गंभीर वार केले. या हल्ल्यात मनोहर हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना तातडीने इर्विनमध्ये नेण्यात आले.
उपचारापूर्वीच मृत्यू
घटनेनंतर जखमी मनोहर यांना तातडीने इर्विन रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त श्याम घुगे, गणेश शिंदे यांच्यासह राजापेठचे ठाणेदार पुनित कुलट यांनी घटनास्थळ गाठले. फॉरेन्सिक टीमला पाचारण करून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर कुलट यांच्या नेतृत्वात राजापेठ डीबी स्कॉड प्रमुख मनिष करपे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने आरोपीला अटक केली. आरोपीने प्रथमदर्शनी खुनाची कबुली दिली आहे.
Web Summary : In Amravati, a man killed his father for refusing to give him 100 rupees for alcohol. The son brutally attacked his father with a wooden stick and iron tool, leading to his death. Police arrested the accused, who confessed to the crime.
Web Summary : अमरावती में, एक व्यक्ति ने शराब के लिए 100 रुपये देने से इनकार करने पर अपने पिता की हत्या कर दी। बेटे ने लकड़ी की छड़ी और लोहे के औजार से अपने पिता पर बेरहमी से हमला किया, जिससे उसकी मौत हो गई। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया, जिसने अपराध कबूल कर लिया।