मुलानेच केली पित्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:17 IST2021-09-15T04:17:05+5:302021-09-15T04:17:05+5:30

टाकरखेडा संभु : दोन मुलांच्या वादात मध्यस्थी करण्यास गेलेल्या वडिलांना एका मुलाने जबर मारहाण केली. या मारहाणीत वृद्ध वडिलांचा ...

The son killed his father | मुलानेच केली पित्याची हत्या

मुलानेच केली पित्याची हत्या

टाकरखेडा संभु : दोन मुलांच्या वादात मध्यस्थी करण्यास गेलेल्या वडिलांना एका मुलाने जबर मारहाण केली. या मारहाणीत वृद्ध वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना भातकुली तालुक्यातील रामा येथे सोमवारी रात्री घडली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मुलास अटक केली आहे. महादेव तायवाडे (७५, रा. रामा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी मुलगा ज्ञानेश्वर तायवाडे याला अटक करण्यात आली आहे.

सोमवारी रात्री मद्यधुंद असलेल्या तायवाडे बंधूमध्ये वाद घरगुती कारणावरून वाद झाला. दरम्यान वडील महादेव तायवाडे यांनी दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्ञानेश्वर याने वडील महादेव तायवाडे यांच्या नाकावर जोरदार बुक्की मारली. यामध्ये ते जखमी झाले. त्यांना तातडीने नजीकच्या आसेगाव आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. तेथे नेत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला,

घटनेची माहिती होताच वलगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. ज्ञानेश्वर तायवाडे विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

Web Title: The son killed his father