सोमवंशींची डीसीपींच्या दालनात हजेरी

By Admin | Updated: April 9, 2015 00:13 IST2015-04-09T00:13:35+5:302015-04-09T00:13:35+5:30

डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात सध्या डीन पदाचे रुजूनाट्य सुरुच आहे.

Somvanshi's DCP's presence in attendance | सोमवंशींची डीसीपींच्या दालनात हजेरी

सोमवंशींची डीसीपींच्या दालनात हजेरी

पीडीएमसीतील 'डीन' पदाचे रुजूनाट्य सुरुच : अधिष्ठाता दिलीप जाणे मुंबईला रवाना
अमरावती : डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात सध्या डीन पदाचे रुजूनाट्य सुरुच आहे. मंगळवारी माजी अधिष्ठाता पद्माकर सोमवंशींनी डीन कक्षाला लावलेले कुलूप जाणे यांनी तोडले होते. त्याअनुषंगाने बुधवारी अधिष्ठाता दिलीप जाणे व सोमवंशींना पोलीस उपायुक्तांनी बोलाविले होते. मात्र, केवळ सोमवंशींनी पोलीस उपायुक्तांच्या दालनात हजेरी लावली असून जाणे मुंबईला रवाना झाल्याची माहिती पीडीएमसीतील सूत्रांनी दिली.
नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पदमाकर सोमवंशींना अधिष्ठाता पदावर रुजू करण्याचे आदेश दिले. मात्र अधिष्ठाता दिलीप जाणे यांनी सस्थेंचे आदेश असल्यास सोमवंशींना रुजू करु, असा पावित्रा उचलला आहे.

Web Title: Somvanshi's DCP's presence in attendance