बडनेऱ्यात काही भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:01 IST2020-04-27T05:00:00+5:302020-04-27T05:01:11+5:30

नूरनगरातील ५३ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर प्रशासन अलर्ट झाले. संपूर्ण परिसर सॅनिटाइज करण्यात आला. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून नूरनगर, खाटीकपुरा, बारीपुरा, मुल्लापुरा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. सदर भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग बंद करण्याचे काम सुरू होते. जुनी वस्तीतील नूरनगर, इस्लामी चौक, अलमासनगर, बिलालनगर, खाटीकपुरा, बारीपुरा या परिसरात यूपीएल मशीनद्वारे फवारणी करण्यात आली.

Some parts of Badnera declared a restricted area | बडनेऱ्यात काही भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित

बडनेऱ्यात काही भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित

ठळक मुद्देपरिसर सॅनिटाइज : हद्दी आवागमनासाठी बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : जुनी वस्तीच्या नूरनगर परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये, यासाठी महापालिका आयुक्तांनी काही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला. फक्त अत्यावश्यक कामासाठीच आवागमनाची परवानगी राहणार आहे.
नूरनगरातील ५३ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर प्रशासन अलर्ट झाले. संपूर्ण परिसर सॅनिटाइज करण्यात आला. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून नूरनगर, खाटीकपुरा, बारीपुरा, मुल्लापुरा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. सदर भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग बंद करण्याचे काम सुरू होते. जुनी वस्तीतील नूरनगर, इस्लामी चौक, अलमासनगर, बिलालनगर, खाटीकपुरा, बारीपुरा या परिसरात यूपीएल मशीनद्वारे फवारणी करण्यात आली. या कामाची पाहणी सहायक आरोग्य अधिकारी अजय जाधव यांनी केली. महापालिका प्रशासनाकडून जनजागृती अभियान राबविले जात आहे. घरात राहा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क लावा, या बाबींची जनजागृती बडनेºयात प्रशासनाकडून होत आहे.

हिस्ट्री शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान
२३ एप्रिल रोजी बडनेऱ्यातील ५३ वर्षीय कोरोनाबाधित सासरी परतवाड्याला गेला होता. मात्र, नेमका कशासाठी गेला, हे पोलिसांनाकडून अद्याप पुढे आले नाही. तो औषधी घेण्याकरिता गेल्याची चर्चा आहे. त्यानंतरच्या दोन दिवसांत कोरोनाबाधित कुणाकुणाच्या संपर्कात आला, हे पोलिसांना शोधावे लागणार आहे. रुग्ण कोरोनाबाधित कसा झाला, याची साखळी प्रशासनाला शोधावी लागेल. दाटीवाटीची वस्ती असल्यामुळे अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.

माळीपुऱ्याचा उल्लेख चर्चेत
महापालिका प्रशासनाने घोषित केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात नूरनगर, खाटीकपुरा, बारीपुरा, माळीपुरा या भागांचा उल्लेख आला होता. या यादीत माळीपुरा कसा, याची चर्चा शहरात होती. कारण हा भाग नूरनगरपासून बराच लांब येतो.

‘त्या’ भागात ड्रोनद्वारे नजर
बडनेरा जुनीवस्तीत नव्याने कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्यामुळे पोलीस, महापालिका प्रशासनाने अलर्ट जारी केले आहे. परिसराला प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात आले. त्यामुळे या भागावर पोलिसांकडून ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जात आहे. रविवारी सकाळी व सायंकाळी प्रत्येकी दोन तास ड्रोनद्वारे बारकाईने घटनाक्रम टिपला जात आहे.

Web Title: Some parts of Badnera declared a restricted area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.