औद्योगिक वसाहतीतील समस्या निकाली काढणार
By Admin | Updated: September 24, 2015 00:19 IST2015-09-24T00:19:51+5:302015-09-24T00:19:51+5:30
सातुर्णा औद्योगिक वसाहत संस्था अनेक वर्षांपासून विविध अडचणींचा सामना करीत आहे.

औद्योगिक वसाहतीतील समस्या निकाली काढणार
पालकमंत्री : औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेद्वारे वृक्षारोपण
अमरावती : सातुर्णा औद्योगिक वसाहत संस्था अनेक वर्षांपासून विविध अडचणींचा सामना करीत आहे. या समस्यांची जाणीव असून लवकरच या समस्यांना कायमस्वरूपी निकाली काढण्याकरिता प्रयत्न करू, असे आश्वासन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले.
सातुर्णा औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेच्यावतीने आयोजित मंगळवारी वृक्षारोपण कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. मंचावर सातुर्णा औद्योगिक संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र लढ्ढा, हिंदुस्थानचे विलास मराठे, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय आदी उपस्थित होते. एलबीटी, संपत्ती कर व सातुर्णा औद्योगिक वसाहतीतील रस्ते यामध्येही सहकारी संस्था औद्योगिक विकासाबरोबरच पर्यावरण संरक्षणातही मोलाची कामगिरी करीत असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविक वीरेंद्र लढ्ढा यांनी केले. संचालन राजेंद्र बुच्चा तर आभार प्रदर्शन बेदरे यांनी केले.
यावेळी सुनील जांगीड, सुरेंद्र देशमुख, नरेंद्र लढ्ढा, प्रकाश हेडा, अजय श्रॉफ, सोमानी, अरूण ढवळे, विनोद डागा आदींसह औद्योगिक वसाहतीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)