शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

अपिलीय सावकारी प्रकरणात घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:43 IST

महाराष्ट्र सावकारी अधिनियमान्वये दाखल अपिलीय प्रकरणात विभागीय सहनिबंधकांद्वारे शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याची तक्रार सावकारग्रस्त अन्याय समितीद्वारे शासनाकडे करण्यात आली. याप्रकरणी सहकारी संस्थांचे अपर निबंधक डॉ. नागनाथ यगलेवाड यांनी २० जुलैच्या पत्रान्वये विभागीय सहनिबंधक आर.जे. दाभेराव यांना मुद्देनिहाय खुलासा उलटटपाली मागितला आहे.

ठळक मुद्देशासनाकडे तक्रार : अपर निबंधकांनी मागितला खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र सावकारी अधिनियमान्वये दाखल अपिलीय प्रकरणात विभागीय सहनिबंधकांद्वारे शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याची तक्रार सावकारग्रस्त अन्याय समितीद्वारे शासनाकडे करण्यात आली. याप्रकरणी सहकारी संस्थांचे अपर निबंधक डॉ. नागनाथ यगलेवाड यांनी २० जुलैच्या पत्रान्वये विभागीय सहनिबंधक आर.जे. दाभेराव यांना मुद्देनिहाय खुलासा उलटटपाली मागितला आहे.विभागातील सर्व जिल्ह्यांत दाखल महाराष्ट्र सावकारी अधिनियमान्वये दाखल प्रकरणात जिल्हा उपनिबंधकांद्वारे शेतकºयाच्या बाजूने निवाडा मिळाला आहे. मात्र, अपिलीय बहुतांश प्रकरणात शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे. यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करीत सावकारग्रस्त अन्याय समितीद्वारे या प्रकरणाची फेरचौकशी निवृत्त न्यायाधीशामार्फत करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली. याच कार्यालयात एका विशिष्ट विधिज्ञाच्या माध्यमातून व्यवहार झाल्यास निकाल सकारात्मक लागतो. त्यामुळे ज्या प्रकरणात हे विधिज्ञ आहेत, त्या सर्व प्रकरणांची फेरचौकशी करण्याची मागणीदेखील समितीद्वारे शासनाकडे करण्यात आली.याप्रकरणी सहकार विभागाचे अवर सचिव मं.ग. जोशी यांनी तक्रारीच्या अनुषंगाने २६ मे रोजीच्या पत्रान्वये स्वयंस्पष्ट अहवाल पुणे स्थित सहकार आयुक्त व निबंधकांना मागितला आहे. अपर निबंधक (प्रशासन) यांच्याद्वारे अपर निबंधक (अंदाज व नियोजन) यांना १६ जुलैच्या पत्राद्वारे १५ दिवसांत या प्रकरणाचा स्वयंस्पष्ट अहवाल मागितला. अपर निबंधक नागनाथ यगलेवाड यांनी विभागीय सहनिबंधक आर.जे. दाभेराव व कार्यालय अधीक्षक डावरे यांना मुद्देनिहाय खुलासा आवश्यक ते सर्व कागदपत्रासह उलटटपाली मागितला.१५ वर्षांपासून अधीक्षक एकाच ठिकाणीविभागीय सहनिबंधक कार्यालयातील अधीक्षक डावरे हे मागील १५ वर्षांपासून विभागीय सहनिबंधक कार्यालयात आहेत. वर्षानुवर्षे एकाच कार्यालयात राहत असल्याने त्यांचाही अनेक प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप समितीद्वारे तक्रारीत करण्यात आला. माझ्या माध्यमातून जाल तरच काम होईल, असे ते बिनधास्तपणे सांगतात. विभागीय सहनिबंधकांची या कर्मचाऱ्यांवर एवढी मर्जी का, असा सवाल समितीने केला तसेच या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे.ही प्रशासकीय बाब आहे. या कार्यालयात कुठलीच अनियमितता झालेली नाही. याबाबतचा खुलासा, अहवाल व माहिती अपर निबंधकांना पाठविण्यात येईल.- आर.जे.दाभेरावविभागीय सहनिबंधक.