सौर कृषिपंपामुळे मिळेल १७०० शेतकऱ्यांना नवऊ र्जा
By Admin | Updated: January 2, 2016 08:29 IST2016-01-02T08:29:27+5:302016-01-02T08:29:27+5:30
विद्युत जोडणीअभावी शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय बंद पडू नये, त्यांच्या कृषीपंपाला किफायतशीर वीजपुरवठा मिळावा, ..

सौर कृषिपंपामुळे मिळेल १७०० शेतकऱ्यांना नवऊ र्जा
दिलासा : भारनियमनापासून होईल सुटका
अमरावती : विद्युत जोडणीअभावी शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय बंद पडू नये, त्यांच्या कृषीपंपाला किफायतशीर वीजपुरवठा मिळावा, वीज बिलातून त्यांची कायमस्वरुपी सुटका व्हावी, यासाठी शासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या सौर ऊर्जा कृषिपंप योजनेत जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी १ हजार ७०० शेतकऱ्यांना सौरपंप देऊन आधार दिला जाणार आहे. यामुळे सौर कृषिपंप एकप्रकारे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी नवऊ र्जाच ठरत आहे.
पारंपरिक वीज निर्मितीसाठी असणाऱ्या मर्यादा आणि वाढती मागणी यामुळे वीज भारनियमनाची आवश्यकता असते. त्यामुळे ग्रामीण भागात कृषिपंपांना पुरेशी वीज उपलब्ध होत नाही. सिंचनात अडथळे येतात. त्यामुळे विहिरीला पाणी असूनही केवळ विजेअभावी पिकांचे नुकसान झाल्याचे अनेक वेळा पहायला मिळते. मात्र पारंपरिक वीज निर्मितीला असणाऱ्या मर्यादा व अशाप्रकारे वीजनिर्मिती करताना होणारे प्रदूषण व हवामामनावरील विपरीत परिणाम, वीजनिर्मितीसाठी खनीज संपत्ती मर्यादित असल्याने सौर ऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जेचा विकास करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे ऊर्जेचे स्त्रोत उपलब्ध करून देण्यास एक भाग म्हणून शेतकऱ्यांना अनुदानावर सौर कृषिपंपाचे वितरणाचे काम सुरू आहे.