सोलर एनर्जीने धारणीतून गाशा गुंंडाळला
By Admin | Updated: December 31, 2014 23:18 IST2014-12-31T23:18:50+5:302014-12-31T23:18:50+5:30
जी रेन्ज सोलर एनर्जी या बोगस कंपनीने महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजंसीची अधीकृत आर.सी. मान्यता न घेताच मेळघाटच्या शंभर ग्रामपंचायतमध्ये अत्यंत हलक्या दर्जाचे कमी सोलर लँप लाऊन

सोलर एनर्जीने धारणीतून गाशा गुंंडाळला
दोन कोटींचा घोटाळा : सचिवांवर निलंबनाची टांगती तलवार
राजेश मालवीय - धारणी
जी रेन्ज सोलर एनर्जी या बोगस कंपनीने महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजंसीची अधीकृत आर.सी. मान्यता न घेताच मेळघाटच्या शंभर ग्रामपंचायतमध्ये अत्यंत हलक्या दर्जाचे कमी सोलर लँप लाऊन दोन कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे लोकमतने उघडकीस आणताच फौजदारी कारवाईच्या धास्तीने कंपनीचे अधिकारी व कर्मचारी धारणीतून कार्यालयाला कूलूप लावून पसार झाले आहे.
याप्रकरणी खा. आनंदराव अडसूळ यांनी विशेष तक्रार देऊन चौैकशीअंती सबंधीतांवर फौजदारी कारवाईची मागणी केल्याने पंचायत समिती मध्ये खळबळ उडाली आहे. सोलर एनर्जी कंपनी उघडण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजंसी येथे २५ लाख रुपयाची अनामत भरुन आर.सी. मान्यता घेण्याचा नियम आहे. मात्र चांदूररेल्वे येथील गणेश शिरभाते व अतुल गणेश शिरभाते यांनी एमईडीए ची कोणतीही अधिकृत मान्यता न घेता धारणीत बोगसरित्या २०१२ मध्ये जी. रेन्ज सोलर एनर्जी नावाने कंपनी उघडली. प्रथम त्यांनी येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयात प्रस्ताव टाकला. मात्र एमईडीएची आर सी मान्यता नसल्याने प्रकल्प अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले. त्यांनी तालुक्यातील ग्रामपंचायत सचिवांना हेरुन २५ टक्के कमिशनचे आमीष दाखविले. काही सचिव आमिषाला बळी पडून कंपनीची कोणतीही शहानिषा न करता ग्रा.पं.च्या विकासासाठी आलेल्या १३ व्या वित्त आयोग, तंटामुक्तीच्या निधीची वाट लावून सचिवांनी बिरोटी, जामपाणी, भोकरबर्डी, झिल्पी, शिरपूर, राणीतंबोली, बिजुधावडी, चटवाबोड, दुनी, चाकर्दा, राजपूर, राणामालूर, हिराबंबई, सावलीखेडा, गोलई, मोगर्दा अशा १०० ग्रामपंचायतींमध्ये हलक्या दर्जाचे साहित्य वापरले. काही सचिवांनी सोलर कंपनीला थेट कॅश होणारे धनादेश दिल्याने लाखो रुपयांचा इनकम टॅक्स चुकविला. या संदर्भातही चौकशी होणे गरजेचे झाले आहे. अनेक गावांत सोलर दिवे न लावता रेकॉर्डवर जास्त दाखवून २० हजार रुपये प्रति लॅम्पप्रमाणे देयके काढण्यात आली आहे. सुमारे दोन कोटींच्या सोलर लॅम्प घोटाळ्याची धारणी पंचायत समितीस्तरावरुन आणि जिल्हा स्तरावरुन चौकशी सुरु झाल्यामुळे ५० सचिवांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.