सौर कृषी पंपाचे निकष शिथिल
By Admin | Updated: December 25, 2016 00:19 IST2016-12-25T00:19:11+5:302016-12-25T00:19:11+5:30
शेतकऱ्यांना उपलब्धी ठरलेल्या सौर कृषिपंप योजनेचे निकष शिथिल केले आहेत.

सौर कृषी पंपाचे निकष शिथिल
शेतकऱ्यांना दिलासा : १० एकरापर्यंत भूधारकांना सवलत
अमरावती : शेतकऱ्यांना उपलब्धी ठरलेल्या सौर कृषिपंप योजनेचे निकष शिथिल केले आहेत. आता १० एकरापर्यंतच्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
महावितरणच्या या योजनेचा जिल्ह्यात सध्या ५६ शेतकऱ्यांनी लाभ घेतला. यामध्ये अमरावती तालुक्यात ४, भातकुली ७, चांदूररेल्वे ४, धामणगाव रेल्वे ४, नांदगाव खंडेश्वर ६, तिवसा १, अचलपूर २, चिखलदरा ३, दर्यापूर ७, चांदूरबाजार ८, मोर्शी ४ व वरूड तालुक्यात ४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी शेतकऱ्याद्वारा सौर कृषिपंपाद्वारा सिंचनाचा लाभ घेत आहेत. या योजनेची आता व्याप्ती वाढविण्यात आली असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असा महावितरणचा प्रयास आहे. तीन अश्वशक्ती एसी पंपासाठी आवश्यक जमिनीचे क्षेत्र ५ एकरापेक्षा कमी असल्यास लाभार्थी हिस्सा ५ टक्क्याप्रमाणे व आवश्यक जमिनीचे क्षेत्र ५ एकरापेक्षा जास्त असल्यास व १० एकरापेक्षा कमी असल्यास लाभार्थी हिस्सा हा ४८ हजार ६०० रुपये राहणार आहे. तीन अश्वशक्तीसह डी.पी. पंपासाठी आवश्यक जमिनीचे क्षेत्र ५ एकराच्या आत असल्यास लाभार्थी हिस्सा २० हजार २५० रुपये व ५ एकरापेक्षा जास्त १० एकराच्या आत लाभार्थी हिस्सा असल्यास १५ टक्क्यांप्रमाणे ६० हजार ७५० रुपये लागणार आहे. ५ अश्वशक्ती ए. सी. पंपासाठी आवश्यक जमिनीचे क्षेत्र ५ एकरापर्यंत असल्यास ५ टक्क्याप्रमाणे २७ हजार रुपये व जमिनीेची क्षेत्र ५ एकराच्यावर १० एकराच्या आत असल्यास १५ टक्क्याप्रमाणे ८१ हजार रुपये व ५ अश्वशक्ती डी. सी. पंपासाठी ५ एकरापर्यंत जमिनीचे क्षेत्र असल्यास ३३ हजार ७५० रूपये व १० एकरापर्यंत क्षेत्र असल्यास १५ टक्क्यांपर्यंत लाभार्थी हिस्सा असल्यास १ लाख १ हजार २५० रुपये राहणार आहे. ७.५ अश्वशक्ती ए. सी. पंपासाठी ५ एकरांपर्यंत क्षेत्र असल्यास ५ टक्क्याप्रमाणे ३६ हजार व १० एकराच्या आत क्षेत्र असल्यास १५ टक्क्याप्रमाणे १ लाख ८ हजार रुपये लाभार्थी हिस्सा राहणार आहे.