शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

खतांच्या पोत्यातून शेतकऱ्यांना विकली कोट्यवधींची माती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 07:35 IST

करोडोंचा चुना; २०२२ पासून पुण्यातील कंपनीद्वारे खत विक्रीची कृषी विभागाकडे नोंदच नाही

- गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पुण्याच्या रामा फर्टिकेम या कंपनीने अनेक जिल्ह्यांत विक्री केलेल्या रासायनिक खतांचा नमुने अहवाल अप्रमाणित आला आहे. खताच्या नावावर कंपनीने चक्क माती विकून शेतकऱ्यांना करोडोंचा चुना लावला आहे. २०२२ पासून खत उत्पादनांसाठी कृषी विभागाचा परवाना असलेल्या या कंपनीद्वारे कोणत्या जिल्ह्यांत किती टन खतांची विक्री केली, याची कुठलीच माहिती कृषी विभागाकडेही उपलब्ध नाही.  

कंपनीविरोधात गुन्हा दाखल संबंधित कंपनीचे अमरावती जिल्ह्यात डीएपी व एनपीके या खतांचे नमुने अप्रमाणित आल्याने कंपनीविरोधात एफआयआर नोंद करण्यात आला. त्यानंतर यवतमाळमधील अनेक तालुक्यांत खतांची विक्री झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आर्वी (जि. वर्धा) येथेही याच कंपनीच्या बोगस खतांचा साठा जप्त करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातही संबंधित कंपनीच्या बोगस खतांची विक्री झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.कंपनीचा परवाना कृषी संचालकांद्वारे रद्द करण्यात आला. ऑनलाइन प्रणालीमध्ये या कंपनीद्वारे किती टन खत कोणत्या जिल्ह्यात विक्री केले याची नोंद नसल्याने कृषी विभागाकडे कंपनीच्या साठ्याची माहिती नाही. 

अनुदान श्रेणीमधील खतेसंबंधित कंपनीद्वारा विक्री करण्यात आलेली रासायनिक खते ही केंद्र सरकारच्या अनुदानाच्या श्रेणीमध्ये येत असल्याने या खतांची ‘आयएफएमएस’ प्रणालीद्वारे विक्री करणे बंधनकारक होते. मात्र, कंपनीद्वारा तसे करण्यात आले नाही; परंतु, केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या ब्रँडच्या नावाने खतांची विक्री केली. कंपनीकडील आयसी प्रमाणपत्राची सद्य:स्थितीदेखील डिसॲक्टिव्ह आहे.

 रामा फर्टिकेम कंपनीचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे. कंपनीने आयएफएमएस प्रणालीद्वारे खतांची विक्री न करता ऑफलाइन केली. त्यामुळे कंपनीद्वारा किती पुरवठा झाला व किती टन खतांची विक्री झाली, त्याची माहिती उपलब्ध नाही. - किसनराव मुळे, विभागीय कृषी सहसंचालक

टॅग्स :Farmerशेतकरी