शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

समृद्धी महामार्गाच्या कामात मातीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 01:40 IST

‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून ज्याचा उल्लेख होतो, त्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामावर परिसरातीलच मातीमिश्रित मुरूम वापरला जात आहे. त्यामुळे महामार्गाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या कामाला लागणारा मुरूम आणि इतर साहित्याकरिता शासनाने रॉयल्टी माफ केली आहे.

ठळक मुद्देरस्त्यावर ढीग : निकृष्ट कामाकडे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे दुर्लक्ष, नागरिकांची ओरड

मनीष कहाते ।लोकमत न्यूज नेटवर्कवाढोणा रामनाथ : ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून ज्याचा उल्लेख होतो, त्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामावर परिसरातीलच मातीमिश्रित मुरूम वापरला जात आहे. त्यामुळे महामार्गाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.समृद्धी महामार्गाच्या कामाला लागणारा मुरूम आणि इतर साहित्याकरिता शासनाने रॉयल्टी माफ केली आहे. त्याचाच फायदा घेऊन संबंधित कंत्राटदार उपलब्ध असेल तेथून मुरूम आणि गिट्टी जशाच्या तशाच स्थितीत ट्रकने आणून रस्त्यावर टाकत आहे. त्यामुळे रस्त्याचा महत्त्वाचा पायाच निकृष्ट बांधकामाने कमकुवत होत असल्याची नागरिकांची ओरड आहे. त्याकडे महाराष्टÑ रस्ते विकास मंडळाने ‘चौकशी करू’ असे म्हणत बोळवण केली आहे.महामार्गावर मुरूम सपाटीकरण केल्यानंतर पाणी टाकायलाच हवे. तथापि, येथे पाण्यासाठी केवळ एकच टँकर आहे. त्यामुळे रस्त्यावर योग्य प्रमाणात पाणी टाकले जात नाही. त्यामुळे दबाई केली की, तात्काळ मुरूम उखडत आहे. काही ठिकाणी शेतातील मातीवरच मुरुमाचे ढिगारे टाकून मशीनच्या साहाय्याने सपाटीकरण केले जात आहे. येथील संपूर्ण जमीन काळी असल्याने मुरुम टाकल्याबरोबर लगेच दबतो. त्यामुळे पुढे हा मार्ग अवजड वाहनांचा कितपत भार सहन करेल, हा प्रश्नच आहे.महामार्गाच्या कामाकरिता मुरूम, दगड प्रचंड प्रमाणात लागत आहे. संबंधित कंत्राटदार शेतातील मुरूम काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी करीत आहे. मुरुमाची वाहतूक वाढोणा ते धानोरा रस्त्यावर ट्रकने होते. हा संपूर्ण रस्ता उखडला आहे. गणेशपूर सिंचन प्रकल्पामध्ये जेसीबीने खोदून मुरूमाचे ट्रक भरधाव वेगात रस्त्याने जात असल्याने आपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.महामार्गाच्या रस्त्यावर मातीमिश्रित मुरूमाचे ढिगारे उभे आहेत. त्या मुरूमाखाली झाडे दबली आहेत. रस्त जमिनीपासून चार ते पाच मीटर उंच होणार आहे. एकूण सहा प्रकारचे साहित्य वापरून महामार्गाची उंची वाढविली जाणार आहे.मुरूमामध्ये माती येणारच. मातीशिवाय मुरूम तयार होत नाही. संपूर्ण महामार्गात मातीचा मुरूम टाकण्यात येत आहे. माती नसलेला मुरूम आणायचा कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.- विशाल कटारे, ज्यु.इंजि., एनसीसी कंपनी, समृद्धी महामार्गतालुक्यातील सर्वच सिंचन प्रकल्प, तलाव, बंधाऱ्यांमधून मुरूम काढला जाऊ शकतो. त्याची परवानगी जिल्हाधिकारी देतात. त्यांना रॉयल्टी माफ आहे. तसा शासनाचा अध्यादेश आहे.- एम.एस. जोरवार,नांदगाव खंडेश्वरमुरूमामध्ये माती कशी आहे, मातीची गुणवत्ता काय आहे, हे ठरवावे. माती वापरण्यायोग्य असेल तर काहीच हरकत नाही. मातीमिश्रित मुरूम प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतरच वापरण्यात येते. माती असेल तर मी प्रत्यक्ष जाऊन चौकशी करते.- संगीता जयस्वाल, अधीक्षक अभियंता,महाराष्टÑ राज्य रस्ते विकास महामंडळ(समृद्धी महामार्ग, अमरावती)

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग