बेलोरा विमानतळ परिसरातून माती चोरीला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:19 IST2021-02-23T04:19:58+5:302021-02-23T04:19:58+5:30

बड़नेरा : बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादित करण्यात आलेल्या शेत जमिनीतून मोठ्या प्रमाणात मातीची चोरी होत आहे. मात्र, संबंधित ...

Soil theft from Belora Airport area | बेलोरा विमानतळ परिसरातून माती चोरीला उधाण

बेलोरा विमानतळ परिसरातून माती चोरीला उधाण

बड़नेरा : बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादित करण्यात आलेल्या शेत जमिनीतून मोठ्या प्रमाणात मातीची चोरी होत आहे. मात्र, संबंधित प्रशासनाचे याकडे असणारे दुर्लक्ष होत असल्यामुळे ही बाब चोरट्यांना चांगलीच फावत आहे. बेलोरा विमानतळाच्या उभारणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित करण्यात आलेल्या आहे. निंभोरा लाहे गावालगत विमानतळाच्या जागेतील माती मोठ्या प्रमाणात चोरीस जात आहे. हा प्रकार गत काही महिन्यापासून निरंतर सुरू असतानाही जिल्हा प्रशासनाचे याकडे सतत दुर्लक्ष होत आहे. महसूलचे अधिकारी या बाबीला गांभीर्याने घेत नाही. परिणामी माती चोरी करणाऱ्यांना चांगलेच फायद्याचे ठरत आहे. विमानतळाची संरक्षण भिंत अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही. बरेच कामे बाकी आहे. संरक्षण भिंत नसल्याने चोरटे ट्रॅक्टरमधून माती चोरुन नेत आहे. माती चोरी होत असल्याच्या चर्चेला परिसरात चांगलेच उधाण आले आहे. संरक्षण भिंतीला उभारण्यासाठी बराच अवधी लागत आहे. अर्धवट भिंतीमुळे विमानतळ परिसरात शिरण्यासाठी जागा मोकळी आहे. रात्रीच्या वेळेस ट्रॅक्टरद्वारे सर्रास माती चोरून नेत असल्याचे बोलल्या जात आहे. यामुळे चोरट्यांचे चोरी करण्यामागचे मनसुबे वाढते आहे. अलिकडे माती चोरीच्या घटना वाढल्या आहेत. प्रशासनाने माती चोरट्यांवर कठोर कारवाई केल्यास चोरीच्या घटनांवर आळा बसविला येऊ शकतो. परंतु, स्थानिक विमानतळ प्रशासन नेमके करते तरी काय, हा प्रश्न देखील यानिमित्ताने समोर आला आहे.

----------------------

संरक्षण भिंतीचे बांधकाम कासवगतीने

बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम येत्या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. मात्र, संरक्षण भिंतीचे बांधकाम कासवगतीने सुरु असल्यामुळे विमानतळ विस्तारीकरणासाठी अधिग्रहित जमिनीतून सर्रासपणे माती चोरी नेण्यात येत आहे. काही भागात जमिनीवर मोठे खड्डे पडले असून, ते बुजविण्यासाठी अधिक खर्च लागेल,असे चित्र आहे. माती चोरीचा मास्टर माईंड कोण? याचा शोध पोलीस, महसूल प्रशासनाने घेतल्यास मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Web Title: Soil theft from Belora Airport area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.