आजपासून ‘सामाजिक ऐक्य पंधरवडा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:17 IST2021-08-20T04:17:40+5:302021-08-20T04:17:40+5:30
अमरावती : दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा २० ऑगस्ट हा जयंती दिवस दरवर्षी सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. ...

आजपासून ‘सामाजिक ऐक्य पंधरवडा’
अमरावती : दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा २० ऑगस्ट हा जयंती दिवस दरवर्षी सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुषंगाने केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाव्दारे सद्भावना दिवस आणि केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाव्दारे २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर हा पंधरवडा ‘सामाजिक ऐक्य पंधरवाडा’ म्हणून साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यानुसार कोविड-१९ प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून राज्य शासनाने दोन्ही प्रसंग साजरे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्माच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांविषयी ऐक्याची भावना, सौहार्द भाव वृध्दींगत करणे व हिंसाचार टाळणे हा पंधरवडा साजरा करण्यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे.
बॉक़्स
शासनाने मार्गदर्शक सूचना जारी
महसूल विभागाने ध्वनीक्षेपकामार्फत सद्भभावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याचे सूचविण्यात आले आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जागेवर उभे राहून किंवा कार्यालयाच्या प्रांगणात डिस्टन्सचे पालन करून सद्भभावना दिवसाची प्रतिज्ञा घ्यावी. कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सद्भावना शर्यतीचे आयोजन करू नये. विद्यापीठे, महाविद्यालये व शाळा बंद असल्याने तेथे यंदा कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.