स्वातंत्र्यदिनी फोटोसह द्या सामाजिक-देशभक्तीपर संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:22 IST2017-08-10T23:21:39+5:302017-08-10T23:22:29+5:30

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ‘लोकमत’ व ‘पवार फोटो स्टुडिओ’च्या संयुक्त विद्यमाने विशेष स्वतंत्र पान प्रकाशित करण्यात येणार आहे.

Social-patriotic messages, with Independence Day photos | स्वातंत्र्यदिनी फोटोसह द्या सामाजिक-देशभक्तीपर संदेश

स्वातंत्र्यदिनी फोटोसह द्या सामाजिक-देशभक्तीपर संदेश

ठळक मुद्देअल्पदरात संधी उपलब्ध : लोकमत, पवार फोटो स्टुडिओचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ‘लोकमत’ व ‘पवार फोटो स्टुडिओ’च्या संयुक्त विद्यमाने विशेष स्वतंत्र पान प्रकाशित करण्यात येणार आहे. एक ते पंधरा वर्षे वयोगटातील चिमुरड्यांची छायाचित्रे देशप्रेम आणि सामाजिक संदेशांसह अल्पदरात या विशेष पानात प्रकाशित करण्यात येतील. यंदा केंद्र शासन देशाचा ७० वा स्वातंत्र्यदिन ‘संकल्प पर्व’ म्हणून साजरा करीत आहे. यापार्श्वभूमिवर लोकमतच्या याविशेष उपक्रमात सहभागी होण्याची संधी चिमुरड्यांना मिळणार आहे.
लोकमतद्वारे स्वातंत्र्यदिनी प्रकाशित होणाºया या विशेष पानामध्ये इच्छुकांनी स्वत:सह त्यांच्या लाडक्यांचे छायाचित्र अत्यल्प दरात प्रकाशित करून स्वत:कडून व कुटुंबाकडून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा द्याव्यात.
प्रकाशित छायाचित्रांचा ‘लकी-ड्रॉ’देखील काढण्यात येणार असून यामध्ये स्पर्धकांना विविध आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रथम बक्षीस सायकल, द्वितीय बक्षीस मोबाईल फोन तर तृतीय बक्षीस म्हणून २.५ बाय ४ फुट फोटो फ्रेम दिली जाणार आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक सहभागीला १५ बाय १२ सें.मी.चा फोटो नि:शुल्क दिला जाईल.
याशिवाय फोटो अंकित असलेले पाच कॉफी मग, फोटो प्रिंट पाच टी-शर्ट, पाच फोटो कॅलेंडर, फोटोंसह पाच रिव्हॉल्व्हिंग क्युब देखील बक्षीस म्हणून दिल्या जाणार आहेत.
या विशेष पानात प्रकाशित करण्यासाठी फोटो स्वीकारण्याची अंतिम तारीख १३ आॅगस्ट ही आहे. तसेच अधिक माहितीसाठी ८८८८५१३६२६ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 

Web Title: Social-patriotic messages, with Independence Day photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.