सोशल मीडियामुळे प्रत्यक्ष संवाद हरपला
By Admin | Updated: December 19, 2015 00:19 IST2015-12-19T00:19:53+5:302015-12-19T00:19:53+5:30
माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिकीकरणाचे केंद्रबिंदू असलेल्या इंटरनेटमुळे माणूस जगात कोणत्याही कोपऱ्यात असला तरी सहजपणे कानोसा घेत आहे.

सोशल मीडियामुळे प्रत्यक्ष संवाद हरपला
विवाहाच्या पत्रिकाही व्हॉट्सअॅपवर : तरूणांचे मैदानी खेळाकडे दुर्लक्ष
अमरावती : माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिकीकरणाचे केंद्रबिंदू असलेल्या इंटरनेटमुळे माणूस जगात कोणत्याही कोपऱ्यात असला तरी सहजपणे कानोसा घेत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आॅनलाईन संवाद साधला जात असल्याने प्रत्यक्ष भेट व यातून निर्माण होणारी मात्रा हरपली जात आहे.
आता ग्रामीण भागातही इंटरनेट व एंड्राईड मोबाईल घराघरांत पोहोचले आहे. वॉट्सअॅपचे वेड तरूणाईला लागले आहे. अगदी १४-१५ वर्षांची मुलंदेखील स्मार्ट फोनच्या अधीन झाले आहे. या वयात शिक्षण, मैदानी खेळ याची गरज असताना व्हॉट्स अॅपचे वेड लागले आहे. पालकांनी आता मुलांना आवर घालण्याची वेळ आलेली आहे. माहिती मिळविण्याच्या नावाखाली सोशल नेटवर्किंगचा गरजेपेक्षा जास्त वापर होत आहे. विद्यार्थी व तरूणांना या गोष्टीचे व्यसन लागले आहे. काही वेळा याच्या गैरवापरामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. आपल्या ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात राहून आपला संवाद साधण्यासाठी व्हॉट्स अॅपचा वापर होत आहे. स्मार्ट फोनच्या रूपाने उपलब्ध सोशल नेटवर्किंगचा अधिक वापर तरूण पिढी करीत आहे. मात्र यापेक्षा जास्त वापर होत असल्यास त्याचे तोटे अधिक आहे. (प्रतिनिधी)