शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

हॉटस्पॉट ठरलेल्या शिवनगर परिसरात साबण-पाण्याची फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:01 IST

साबण-पाण्याच्या द्रावणात (हँडवॉश) कोरोना विषाणू २० सेकंदात नष्ट होतो. या तत्त्वानुसार मराठी विज्ञान परिषद तज्ज्ञ प्रवीण विधळे यांच्या मार्गदर्शनात शिवनगर भागातील सुमारे ६०० घरांची दारे, अंगण, गेट, गाड्यांवर शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस सायंकाळच्या सुमारास निरमा व रिन पावडरचे पाण्यातील मिश्रण फवारण्यात आले.

ठळक मुद्देसंडे अंकर : मराठी विज्ञान परिषद-महानगरपालिका यांचा संयुक्त उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाला आळा घालण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मराठी विज्ञान परिषद व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या शिवनगर, संतोषीनगर भागात दोन दिवसांत साबण-पाण्याची फवारणी करण्यात आली.साबण-पाण्याच्या द्रावणात (हँडवॉश) कोरोना विषाणू २० सेकंदात नष्ट होतो. या तत्त्वानुसार मराठी विज्ञान परिषद तज्ज्ञ प्रवीण विधळे यांच्या मार्गदर्शनात शिवनगर भागातील सुमारे ६०० घरांची दारे, अंगण, गेट, गाड्यांवर शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस सायंकाळच्या सुमारास निरमा व रिन पावडरचे पाण्यातील मिश्रण फवारण्यात आले. त्याचवेळी नागरिकांना मास्कसह घरातील सर्व वस्तूंना अशाच द्रावणाने धुवून काढण्यास सांगण्यात आले. प्रवीण गुल्हाने यांच्या नेतृत्वात ३० पेक्षा अधिक युवक व महापालिकेचे २० कर्मचारी असे ५० जण यात राबले. त्यांनी आधी घरोघरी माहिती पत्रकाचे वाटप करीत परिसरातील बहुतांश अंगणामध्ये फवारणीसाठी नागरिकांचे मत बनविले. पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल व महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्या परवानगीने हा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात आला. यावेळी नगरसेवक संजय वानरे, नीता राऊत, धीरज हिवसे, माधुरी ठाकरे यांच्यासह योगेश पिठे, धनंजय शिंदे, अनिल गोहर, गावनेर, प्रमोद पांडे, प्रदीप बाजड, मिलिंद सराफ, नरेशचंद्र काठोळे, संदीप गोडबोले, प्रशांत साखरकर, दीपक कोल्हे, मंगेश बडनखे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक