- तर आम्ही मरून जाऊ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:14 IST2021-02-09T04:14:14+5:302021-02-09T04:14:14+5:30
पान २ ची लिड स्टोरी तीन बातम्या एकत्र व दोन छोटे बॉक्स वरूड : आम्ही पुण्याला जात आहोत. तुम्ही ...

- तर आम्ही मरून जाऊ!
पान २ ची लिड स्टोरी
तीन बातम्या एकत्र व दोन छोटे बॉक्स
वरूड : आम्ही पुण्याला जात आहोत. तुम्ही आम्हाला परत बोलावल्यास आम्ही मरून जाऊ, असे बोलून एका १७ वर्षीय मुलीने फोन डिस्कनेक्ट केला. हा खळबळजनक प्रकार तालुक्यातील एका गावात उघड झाला. याप्रकरणी मुलीच्या काकाच्या तक्रारीवरून बेनोडा पोलिसांनी आरोपी निखिलेश अशोक डाखोडे (रा. पेठ मांगरूळी) याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला.
तालुक्यातील एका इसमाकडे त्यांची १७ वर्षीय पुतणी दोन महिन्यांआधी कामानिमित्त आली. ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ नंतर ती काकाच्या घरून बाहेर पडली. उशिरापर्यंत घरी न पोहोचल्याने तिचा शोध घेण्यात आला. दरम्यानच्या काळात तिच्या काकूने तिला फोन कॉल केला. घरातून बाहेर पडलेल्या त्या मुलीने फोनवरून काकूशी संवाद साधला. निखिलेश डाखोडेसोबत मी पुण्याला जात आहे. आता परत येणार नाही, असे सांगितले. यानंतर आरोपी निखिलेशसुद्धा मुलीच्या काकूशी बोलला. त्यानंतर फोन कॉल बंद झाला. जबाबदारीवर आणलेली भावाची मुलगी प्रियकर तरुणासोबत पुण्याला गेल्याचे समजताच त्या ४५ वर्षीय गृहस्थाने पत्नीसह बेनोडा पोलीस ठाणे गाठले. आपबीती कथन केली. बेनोडा पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
-------------------------------
प्रेम कर; अन्यथा हाताची नस कापून घेईन!
१६ वर्षीय मुलीचा विनयभंग : पहाटे ३ वाजता शिरला घरात
ब्राम्हणवाडा थडी : माझ्यावर प्रेम कर, अन्यथा मी माझ्या हाताची नस कापून घेईन, अशी धमकी देत एका सडक सख्याहरीने १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केला. ६ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजता चांदूर बाजार तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. याप्रकरणी ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी आरोपी लखन तांडीलकर याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३५४, ३५४ ड, ३५४ अ, ४५२, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, आरोपी लखन हा त्या १६ वर्षीय मुलीचा नेहमीच पाठलाग करायचा. तुझ्यावर प्रेम करतो, अशी बतावणी करायचा. प्रेमास नकार दिल्यास आत्महत्येची धमकीदेखील द्यायचा. ६ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ च्या सुमारास ती लघुशंकेकरिता उठली असता, आरोपी हा तिच्या घरात शिरला. तिला घराच्या वरच्या माळ्यावर नेले. तेथे तिचा विनयभंग केला. अचानक घडलेल्या या घटनेने भेदरलेल्या त्या षोडशीने जिवाच्या आकांताने आरडाओरड केली. त्यामुळे तिचे वडील तेथे आले. आरोपीने माडीवरून खाली उडी घेऊन पळ काढला. नेहमीचा पाठलाग व अर्ध्या रात्री घरात शिरल्याचा शिरजोरपणा सहन करण्यापलीकडे गेल्याने त्या मुलीने वडिलांना सोबत घेऊन ब्राम्हणवाडा थडी पोलीस ठाणे गाठले. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ च्या सुमारास याप्रकरणी आरोपी लखन तांडीलकरविरुद्ध गुन्हा दाखल केला.
--------------
अल्पवयीन मुलीला खुनाची धमकी
माहुली : अमरावती तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय मुलीला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली तथा तिच्या घरात शिरून विनयभंग करण्यात आला. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी माहुली जहागीर पोलिसांनी आरोपी सुमीत अनिल ससाणे (२०, रा. अंतोरा) याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३५४, ३५४ अ, ४५२, ५०६ व पोक्सोतील कलम ८, १ ट अन्वये गुन्हा दाखल केला. शनिवारी पीडित मुलीचे आई-वडील व भाऊ शेतमजुरीकरिता गेले असता, आरोपी तिच्या घरात शिरला. जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. माझ्याशी बोलली नाहीस, तर मारून टाकेन, अशी धमकी दिली. प्रसंगावधान राखत ती त्याच्या हाताला झटका देऊन घराबाहेर पळाली. काकूच्या घरी जाऊन झालेला प्रसंग त्यांच्या कानी घातला. आई-वडील कामाहून परतल्यानंतर ती पालकांसोबत माहुली पोलीस ठाण्यात पोहोचली.
------------------
दोन बॉक्स
१७ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष
अंजनसिंगी : परिसरातील एका शिवारातून १७ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्यात आले. ४ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत ही घटना घडली. ती मुलगी आई-वडिलांसह शेतातील खोपडीत राहत होती. याप्रकरणी मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून कुऱ्हा पोलिसांनी आरोपी अंकुश शिवा हटकर (२०, रा. चिंचोली. ता. मोर्शी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
------------
तिवसा येथून मुलीला पळविले
तिवसा : तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले. ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना उघड झाली. मुलीचे वडील हे वाहनचालक असून, संशयित आरोपीदेखील तेच काम करतो. त्यामुळे त्याची मुलीच्या घरी ये-जा होती. ती त्याच्यासोबतच गेली असावी, असा संशय मुलीच्या आईने ६ फेब्रुवारी रोजी तिवसा पोलिसांत नोंदविलेल्या तक्रारीत व्यक्त केला. पोलिसांनी संशयित म्हणून अक्षय राजू बद्रे (२२, रा. वºहा) याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला.
---------------