गोवंशाची चोरटी वाहतूक, कंटेनर पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:13 IST2021-04-23T04:13:12+5:302021-04-23T04:13:12+5:30

हरी मोहन ऊर्फ हरीश रामचंद्र चौधरी, (४७, रा. कमलपुरा, कोटा, रामगंजमंडी, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव ...

Smuggled cattle, seized container | गोवंशाची चोरटी वाहतूक, कंटेनर पकडला

गोवंशाची चोरटी वाहतूक, कंटेनर पकडला

हरी मोहन ऊर्फ हरीश रामचंद्र चौधरी, (४७, रा. कमलपुरा, कोटा, रामगंजमंडी, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ९ लाख ३० हजार रुपये किमतीचे ६२ गोवंश व २२ लाख रुपये किमतीचा यूपी २१ एएन ३५५० क्रमांकाचा कंटेनर जप्त करण्यात आला. शिरजगाव पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हद्दीतील बहिरम नाका येथे नाकाबंदी करून ही कारवाई करण्यात आली. गोवंश गोरक्षण संस्थान बेलोरा येथे सुस्थितीत हलविण्यात आले. गुन्हा दाखल करून आरोपी चालकास अटक करण्यात आली. ठाणेदार पंकज दाभाडे यांच्या मार्गदर्शनात पोउपनि मनोज सुरवाडे, नापोका पुरुषोत्तम माकोडे, अंकुश अरबटसह शिरजगाव पोलिसांनी केली.

Web Title: Smuggled cattle, seized container