वाळू माफियांची मुस्कटदाबी सुरुच

By Admin | Updated: December 10, 2014 22:50 IST2014-12-10T22:50:31+5:302014-12-10T22:50:31+5:30

नियमबाह्य पद्धतीने गौण खनिजाचे उत्खनन करुन लाखो रुपयांचे महसूल बुडविणाऱ्या चोरट्यांची मुस्कदाबी करण्यासाठी महसूल विभाग पुढे सरसावला आहे. बुधवारी रात्री रेती, मुरुमाची अवैध

Smile of the sand mafia | वाळू माफियांची मुस्कटदाबी सुरुच

वाळू माफियांची मुस्कटदाबी सुरुच

अमरावती: नियमबाह्य पद्धतीने गौण खनिजाचे उत्खनन करुन लाखो रुपयांचे महसूल बुडविणाऱ्या चोरट्यांची मुस्कदाबी करण्यासाठी महसूल विभाग पुढे सरसावला आहे. बुधवारी रात्री रेती, मुरुमाची अवैध वाहतूक करणारे पाच वाहने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दंडात्मक रक्कम वसूल केली आहे. भरारी पथकाची ही मोहीम निरंतर सुरु राहणार आहे.
एम.एच २९, ए. के- ५८६७ आणि एम.एच. २७, एल- २४८७ ही दोन वाहने अवैधरित्या मुरुमाची वाहतूक करीत असताना महसूल विभागाच्या भरारी पथकाने पकडली. या वाहनातील चालकाकडे गौण खनिज वाहतूक करण्याचा परवाना नव्हता. तसेच ट्रक क्र.सी.जे- १२, सी. ओ.१७३, एम.एच. ३७- ४१४२, एम.एच. १०, ए- १६२७ या तीन वाहनांना अवैधरीत्या वाळू वाहतूक करताना ताब्यात घेण्यात आले आहे. महसूल कायद्यानुसार, राजेश भीमराव रोतडे यांच्याकडून २४ हजार ४०० रुपये, शेख जावेद शेख सादीक यांच्याकडून १८ हजार ३०० रुपये, दिलीप बोबडे यांच्याकडून २४ हजार ४०० रुपये तर अजय ढोके यांच्याकडून ६ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. महसूल विभाग अवैध गौण खनिज वाहतूक व उत्खनन करणाऱ्यांची मुस्कटदाबी करण्यासाठी कठोर पावले उचलत असल्याचे चित्र आहे. ही कारवाई तहसीलदार सुरेश बगळे यांच्या मार्गदर्शनात मंडल अधिकारी कल्याणकर, देशमुख, तलाठी घुगले, आंबेकर, वऱ्हाडे, सावरकर, वानखडे, धर्माळे आदींनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Smile of the sand mafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.