टेक्नो फेअरमधून ‘स्मार्ट सिटी’चा प्रचार

By Admin | Updated: December 12, 2015 00:21 IST2015-12-12T00:21:01+5:302015-12-12T00:21:01+5:30

‘स्मार्ट सिटी’चा प्रचार व प्रसार करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने दोन दिवसीय ‘टेक्नो फेअर’ आधुनिक तंत्रज्ञान ..

'Smart City' promotion from the Techno Fair | टेक्नो फेअरमधून ‘स्मार्ट सिटी’चा प्रचार

टेक्नो फेअरमधून ‘स्मार्ट सिटी’चा प्रचार

प्रदर्शनीला प्रतिसाद : नागरिकांसह विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त गर्दी
अमरावती : ‘स्मार्ट सिटी’चा प्रचार व प्रसार करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने दोन दिवसीय ‘टेक्नो फेअर’ आधुनिक तंत्रज्ञान आणि साहित्य प्रदर्शनीला शुक्रवारी प्रारंभ करण्यात आला. येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन परिसरात ही प्रदर्शनी आयोजित करण्यात आली नागरिकांसह विद्यार्थ्यांनी भेट देवून आधुनिक, प्रगत तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली.
राष्ट्रवादी फ्रंटचे गटनेता अविनाश मार्डीकर यांच्या हस्ते ‘टेक्नो फेअर’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी झोन सभापती मिलिंद बांबल, लुबना तनीवर, विधी समितीच्या उपसभापती सुनीता भेले, नगरसेवक प्रदीप बाजड, राजेंद्र महल्ले, सुजाता झाडे, जयश्री मोरय्या, उपायुक्त विनायक औगड, चंदन पाटील, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर आदी उपस्थित होते. दरम्यान गटनेता अविनाश मार्डीकर यांनी प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आल्याची घोषणा केल्यानंतर ही प्रदर्शनी निश्चितपणे ‘स्मार्ट सिटी’त भर पाडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही प्रदर्शनी उद्या शनिवारी सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यत सुरु राहणार असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Web Title: 'Smart City' promotion from the Techno Fair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.