इसमाची झोपेत गळा चिरून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2017 00:06 IST2017-06-21T00:06:00+5:302017-06-21T00:06:00+5:30

अनैतिक संबंधातून एकाची झोपेतच गळा चिरून हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी मध्यरात्रीनंतर दहा किमी अंतरावरील धुळघाट येथे घडली.

Slowly slaughtered in my sleep and murdered | इसमाची झोपेत गळा चिरून हत्या

इसमाची झोपेत गळा चिरून हत्या

आरोपी पसार : अनैतिक संबंध ठरले कारणीभूत
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : अनैतिक संबंधातून एकाची झोपेतच गळा चिरून हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी मध्यरात्रीनंतर दहा किमी अंतरावरील धुळघाट येथे घडली. रामप्रसाद सदाशिव साटोटे (३५,रा.धुळघाट) असे मृताचे नाव आहे. मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, रामप्रसादची पहिली पत्नी त्याला सोडून गेली. त्यानंतर त्याने ललिता हरिराम जांबेकर हिला त्याच्या घरी आणले होते. दोघेही मागिल तीन महिन्यांपासून एकत्र राहात होते. ललिताने सुद्धा तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट दिला नव्हता. सोमवारी रात्री रामप्रसाद व ललिता अंगणात झोपले.

ललिता बेपत्ता
धारणी : सकाळी रामप्रसादचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला तर ललिता सुद्धा बेपत्ता होती. याघटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी मृताची आई विमल साटोटे हिने धारणी पोलिसांत तक्रार दिली आहे. रामप्रसादच्या मृत्युसाठी ललिताचा पती हरिराम जांबेकर कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. यामुळे हरिराम याने ललितासह पलायन केले असावे, असा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी धारणी पोलिसांनी हरिरामचे वडिल कापू व भाऊ सखाराम यांना ताब्यात घेतले आहे. ही हत्या अनैतिक संबंध व बदल्याच्या भावनेतून करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणाची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल मेहुल यांनी जाणून घेतली. तसेच फरार आरोपींचा शोध घेण्याचे आदेशही दिलेत.

Web Title: Slowly slaughtered in my sleep and murdered