शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदीसाठी ‘करो या मरो’चा नारा

By admin | Updated: May 24, 2017 00:08 IST

कोर्कडा येथील दारू दुकान बंद व्हावे यासाठी महिलांनी ‘करो या मरो’ ही भूमिका घेतली आहे.

महिलांचे आंदोलन : रखरखत्या उन्हात दुकानासमोर ठिय्यालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोर्कडा येथील दारू दुकान बंद व्हावे यासाठी महिलांनी ‘करो या मरो’ ही भूमिका घेतली आहे. शेडगावातील महिलांनी कोकर्डा येथील दारू दुकानासमोरच तळ ठोकून सोमवारपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे. हे दुकान बंद करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.शंभर वषार्पूर्वी संतश्रेष्ठ गाडगेबाबांनी त्यांच्या जन्मभूमी परिसरातील सुमारे ६८ दारूच्या हातभट्ट्या बंद करण्यासाठी जनआंदोलन उभारले होते. त्याच शेंडगावातील महिलांनी राज्य शासनाची मान्यता असलेले देशी दारूदुकान बंद व्हावे, यासाठी आंदोलनाला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे ४५ डीग्री तापमानात हे आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान एका महिलेची प्रकृति बिघडल्याने तिला उपचारार्थ रुग्णालयात पाठविन्यात आले. महामार्गावर दारूबंदीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर संपूर्ण दारूबंदी व्हावी यासाठी जिल्हाभरात आंदोलने सुरू आहेत. कोकर्डा येथील बाजारपेठेत असणारे दारू दुकान बंद व्हावे यासाठी चार गावातील महिलांनी एकत्रित येत आंदोलन सुरू केले आहे. कोकर्डा शहराच्या मुख्य भागात मागील ४० वर्षांपासून देशी दारूचे दुकान सुरू आहे. या दुकानामुळे अनेकांना त्रासाचा सामना करावा लागतो. मागील वर्षी झालेल्या ग्रामसभेत हे दारूचे दुकान बंद करण्यात यावे, असा ठराव घेण्यात आला होता. यावर्षीदेखील हे दुकान गावाबाहेर स्थानांतरित करण्यात यावे असा ठराव घेतला होता. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हे देखील हे दारूचे दुकान बंद व्हावे, यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र, त्याचे प्रयत्न अपुरे पडल्याने अखेर महिलांनी मोर्चा सांभाळला. आंदोलन सुरू होताच दुकान मालकाने दुकानाला कुलूप लावले. मात्र, हे कुलूप कायमस्वरूप लावण्यात यावे अशी मागणी महिलांनी केली आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी व वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी केली जात आहे. या आंदोलनात कोकर्डा, शेडगाव, ब्राह्मणवाडा, देऊळगाव या गावातील शेकडो महिला सहभागी झाल्या आहेत. हे दारू दुकान बंद करावे यासाठी यापूर्वी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणात मध्यस्थीचा प्रयत्न तहसीलदारांनी केला होता. मात्र, महिलांनी दारू दुकान बंद होईपर्यंत आंदोलन करण्याचा पावित्रा घेतला.