कत्तलखान्याची फाईल गायब?
By Admin | Updated: November 23, 2014 23:11 IST2014-11-23T23:11:00+5:302014-11-23T23:11:00+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महापालिकेने वलगाव मार्गावर साकारलेल्या अत्याधुनिक कत्तलखान्याची फाईल गायब झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे कत्तलखान्याशी

कत्तलखान्याची फाईल गायब?
महापालिका अनभिज्ञ : गौडबंगाल झाल्याचा संशय
अमरावती : सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महापालिकेने वलगाव मार्गावर साकारलेल्या अत्याधुनिक कत्तलखान्याची फाईल गायब झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे कत्तलखान्याशी निगडित असलेल्या अनेक महत्त्वपूर्ण बाबींचा उलगडा कसा करावा, हा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. जनावरांची कटाई, मांसविक्री ते टाकाऊ प्रदार्थ, रक्त आदींवर पर्यावरण प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने शासननिधीतून अत्याधुनिक कत्तलखाना साकारला. हा कारखाना सुरु होणार असताना १५ संघटना, गोवंश बचाव समितीच्यावतीने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात महापालिकाविरोधात धाव घेतली.