शेंदूरजनाघाट येथील कत्तलखाना अखेर रद्द

By Admin | Updated: December 16, 2014 22:45 IST2014-12-16T22:45:11+5:302014-12-16T22:45:11+5:30

स्थानिक नगर पालीकेने कत्तलखान्याला मंजुरात दिल्याची कुणकुण लागताच येथील हिंदुत्ववादी संघटनांनी नगरपरिषद कार्यालयावर धडक देऊन सदर कत्तलखाना रद्द करण्याची मागणी केली होती.

Slaughter house at Shendurjnaghat finally canceled | शेंदूरजनाघाट येथील कत्तलखाना अखेर रद्द

शेंदूरजनाघाट येथील कत्तलखाना अखेर रद्द

शेंदूरजनाघाट : स्थानिक नगर पालीकेने कत्तलखान्याला मंजुरात दिल्याची कुणकुण लागताच येथील हिंदुत्ववादी संघटनांनी नगरपरिषद कार्यालयावर धडक देऊन सदर कत्तलखाना रद्द करण्याची मागणी केली होती. तर, नगरसेवकांनीसुध्दा यावर आक्षेप घेऊन तातडीची सभा बोलाविली होती. कत्तलखाना रद्द करण्याचा ठराव घेऊन मुख्याधिकाऱ्यांचा ठराव रद्द केला. मुख्याधिकारी प्रकाश राठोड यांनी सभागृहाची जाहीर माफी मागितल्याने हे प्रकरण निवळले.
शेंदूरजनाघाट नगरपरिषदेने कत्तलखाना सुरु करण्याबाबत ठराव घेतल्याचे प्रकरण शिवसेना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मनसेसह आदी संघटनांमध्ये चांगलेच तापले होते. याबाबत नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष व उपस्थित नगरसेवकांना याबाबत विचारणा केली असता. कत्तलखान्याला परवानगी दिली नाही. असे सांगताना आम्ही फक्त मटण मार्केट गावाबाहेर नेण्यासंदर्भात ठराव घेतला असल्याचे सांगितले. कत्तलखान्याला मंजुरात दिल्याचे न.प. रजिस्टरवर घेतलेल्या ठरावावरून सिध्द झाले. मात्र, विद्यमान पदाधिकाऱ्यांना मटण मार्केट बाहेर न्यायचे म्हणून ठराव पारित केल्याचे दिसून येते. याच ठरावाचा फायदा घेवून शासनाचा जी.आर.बाबतचा उल्लेख करून हा ठराव मुख्याधिकारी प्रकाश राठोड यांनी संमत करून घेतला. परंतु सभागृहातील सदस्यांना विश्वासात न घेता ठरावात गाय, बैल व म्हैस यांचे मांस येते याचा उल्लेख ठराव करताना सर्वसामान्य सभेत केला नाही. व सभागृहाची दिशाभूल करून कत्तलखाना मंजुरीचा ठराव संमत करून घेतला. अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना वाटले, आपण जनतेला सर्व एकाच ठिकाणी देऊ, मात्र जनतेला त्रास होणार नाही. अशा सोयींनी मार्केट गावाबाहेर नेण्यावर ठराव संमत केल्याचे वाटले. कत्तल खान्याचे दानपत्रसुद्धा पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता मुख्याधिकारी यांनी लिहून दिले.
मुख्याधिकारी प्रकाश राठोड यांनी कत्तलखाना मंजुरातीला जसे सभागृहाला विश्वासात न घेता ठराव मंजुर केला. कत्तलखान्या संदर्भात जी फाईल उघडली यात मुख्याधिकाऱ्याचा प्रताप दानपत्रावरून उघडकीस आला. कत्तलखान्यासाठी नगरपरिषदेजवळ नियोजित जागा नसल्यामुळे शहराची गैैरसोय होत आहे. ती होऊ नये म्हणून नगरपरीषद शेंदुरजनाघाट यांच्या विनंतीवरून महम्मद सलमान महम्मद उस्मान यांनी त्यांच्या मालकीचे शेत दान करीत असल्याचा उल्लेख दानपत्रावर आहे. एवढेच नाही तर दानपत्र लिहून घेणाऱ्याचे नाव मुख्याधिकारी व सही त्याचप्रमाणे पासपोर्ट साईजचे रंगीत छायाचित्र प्रकाश राठोड यांचे आहे. विशेष म्हणजे हे दानपत्र १०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर कोर्ट नोटरी केले आहे. या संदर्भात विविध संस्था व पक्ष यांच्या पदाधिकारी यांनी आजी,माजी नगराध्यक्ष व उपाध्यक्ष व सदस्यांना विचारले असता आम्हाला यातील काहीच माहिती नसल्याचे सांगितले. यावरून सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. याचे तीव्र पडसाद गावात उमटले. अखेर कत्तलखान्याच्या न्याय निवाड्यासाठी अध्यक्षांनी विशेष सभेचे आयोजन केले सभा सुरू होताच मुख्याधिकारी राठोड यांना न.प. सदस्यांनी कत्तलखान्याच्या दानपत्राच्या मुद्यावर धारेवर धरले. कत्तलखान्याचा ठराव मंजुरातीच्या वेळी सभागृहाची दिशाभुल का केली. आम्ही दान पत्राच्या संदर्भात ठराव केला नसताना दानपत्र कसे केले. सभागृहाचे दानपत्रासंदर्भात किंवा गुराढोरांच्या कत्तलखाना व त्यासाठी लागणाऱ्या जागेबाबत विषयच नसल्यामुळे न.प.कडून जागा उपलब्ध करून देण्याचा विषय नसताना तुम्ही दानपत्रात न.प.च्या विनंतीचा उल्लेख कसा केला आम्ही तर विनंती अर्ज द्या असे कधीही म्हटले नाही. असे म्हटले होते.(वार्ताहर )

Web Title: Slaughter house at Shendurjnaghat finally canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.