षोडशीचे तीन वर्षांपासून लैंगिक शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:13 IST2021-05-19T04:13:36+5:302021-05-19T04:13:36+5:30

अमरावती : तीन वर्षांपासून लैंगिक शोषण होत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील १६ वर्षीय मुलीची चाईल्ड लाईनने रेल्वे पोलिसांच्या मदतीने १५ ...

Sixteen years of sexual abuse | षोडशीचे तीन वर्षांपासून लैंगिक शोषण

षोडशीचे तीन वर्षांपासून लैंगिक शोषण

अमरावती : तीन वर्षांपासून लैंगिक शोषण होत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील १६ वर्षीय मुलीची चाईल्ड लाईनने रेल्वे पोलिसांच्या मदतीने १५ मे रोजी सुटका केली. बडनेरा जीआरपी पोलिसांनी आरोपीला अटक करून सोलापूर पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस सूत्रांनुसार, गोविंद बबन लोखंडे (२२, रा. सोलापूर) याला बडनेरा जीआरपी पोलिसांनी अटक करून सोमवारी सोलापूर पोलिसांच्या स्वाधीन केले. सोलापूर पोलीस आरोपी गोविंद व पीडित मुलीला सोबत घेऊन गेले आहेत. गोविंदने सदर मुलीला तीन वर्षांपासून फूस लावून सोलापुरातून बडनेऱ्यात पळवून आणले होते. एका ठिकाणी त्याने खोली भाड्याने घेतली. तो घराबाहेर जाताना दाराला कुलूप लावत होता. त्यामुळे ती घराबाहेर निघू शकत नव्हती वा कुणाशीही संपर्क साधू शकत नव्हती.

------------------

सहावीत असताना आणले बडनेऱ्यालाचाईल्ड लाईनने केलेल्या चौकशीदरम्यान सहाव्या वर्गात असतानाच गोविंदने रेल्वेत बसवून पळवून आणल्याचे तिने सांगितले. मात्र, ती कुठे आली व कुठल्या भागात राहते आहे, हे ती सांगू शकत नव्हती. बडनेरातील एका पाच मजली इमारतीत त्यांचे वास्तव्य होते.

-------------

कडी उघडी दिसताच पलायन

गोविंदने तिच्याशी जबरीने शारीरिक संबध प्रस्थापित केले. त्यामुळे ती गरोदर राहिली. गोविंद हा बाहेर जाताना कुलूप लावत असल्याने तिला बाहेर पडता येत नव्हते. मात्र, १५ मे रोजी तो दाराला कडी लावणे विसरला.

ही संधी साधून तिने पळ काढला व नागरिकांना विचारत थेट बडनेरा रेल्वे स्थानक गाठले. दुपारी दीडच्या सुमारास ती घाबरलेल्या अवस्थेत चाईल्ड लाईनच्या सदस्यांना आढळली. अंगावर वस्त्रांमुळे विवाहित, परंतु अल्पवयीन असल्याचीही शंका आल्याने चाईल्ड लाईनचे सदस्य नितेश भुताडे, रमेश मोंढे, को-ऑर्डिनेटर सारिका वानखडे, कौन्सेलर प्रियंका मांजरे यांनी तिची विचारपूस केल्यानंतर धक्कादायक माहिती पुढे आली.

-------------

२०१९ मध्ये हरिवल्याची तक्रार सदर मुलीच्या कुटुंबीयांनी २०१९ मध्ये सोलापूर जिल्ह्याच्या टेंभुर्णा पोलीस ठाण्यात ती हरविल्याची तक्रार नोंदविली होती. ती १५ मे रोजी चाईल्ड लाईनने रेल्वे पोलिसांच्या मदतीने पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिला बाल निरीक्षणगृहात

पाठविले. कुटुंबीयांचा मोबाईल क्रमांक मिळवून आई-वडिलांशी संपर्क केला. अमरावती बाल कल्याण समिती आणि सोलापूर

बाल कल्याण समिती यांच्या माध्यमातून आता पुढील कारवाई सुरू आहे.

-----------मुलांच्या सुरक्षेसाठी चाईल्ड लाईन

बडनेरा रेल्वे स्थानकावर सहा महिन्यांपासून चाईल्ड लाईनची शाखा कार्यरत असून, चाईल्ड लाईनचे सदस्य हरविलेली लहान मुले-मुली, चुकून रेल्वेस्थानकावर राहून गेलेल्या लहान मुलांच्या सुरक्षेसाठी काम करते.

Web Title: Sixteen years of sexual abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.