गोंडविहीर तलावातून रेती उपसा, सहा ट्रक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:29 IST2021-02-05T05:29:27+5:302021-02-05T05:29:27+5:30
परतवाडा : स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत गोंडविहीर तलावात रेतीचा अवैध उपसा करताना परतवडाचे पोलिसांनी सहा ट्रक ताब्यात घेण्यात आले. पोलिसांना ...

गोंडविहीर तलावातून रेती उपसा, सहा ट्रक ताब्यात
परतवाडा : स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत गोंडविहीर तलावात रेतीचा अवैध उपसा करताना परतवडाचे पोलिसांनी सहा ट्रक ताब्यात घेण्यात आले. पोलिसांना पाहताच चालकासह तेथील कामगार पळाले.
परतवाडाचे उपनिरीक्षक मनोज कदम व सहायक पोलीस पथकातील राजेश पटेल, गणेश बेलोकार जयसींग चव्हाण, शुभम माकड असे मल्हारा बिट क्षेत्रात अवैध धंद्यावर काराईसंदर्भात व शासनाने रेती संदभार्त पारित केलेल्या अदेशाच्या सूचनाप्रमाणे अवैधरीत्या माती उत्खनन करणाऱ्या आरोपीच्या शोधार्थ गेले असता, त्यांनी गोंडविहीर तलावात ५-६ ट्रक व टॅक्टर टॉलीत अवैधरीत्या माती उत्खनन करून वाहतूक करताना आढळले. पोलिसांनी गोंडविहीर तलावात ट्रक क्रमांक एमएच ३४ एम ३५२१, एमएच-२७/एक्स३६३०, एमएच-२७/बीएक्स-३५९१, एमपी-२८/८-१६५५, एमएच-३१/४७५६ व विना नंबर असलेला निळया रंगाचा टॅक्टर व त्याला लागलेली लाल रंगाची टॉली मिळून आली. तेथे हजर असलेले लोक पोलिसांना पाहून पळून गेले. वाहन तपासले असता त्यात माती भरलेली आढळून आली. वरील नमुद वाहनाचे चालक/ मालक तसेच वाहनात माती भरणारे लोक वाहन तपासण्यापूर्वीच पळून गेले.
बॉक्स
तहसील कार्यालयात वाहने जमा
सहा वाहनांतील मातीसंबंधी अचलपूरच्या तहसीलदारांना कळविण्यात आले. तहसीलदारांच्या अधिनिस्त संबंधित तळाठी गजानन शेळके हे घटनास्थळी उपस्थित झाले. त्यांनी पंचासमक्ष घटनास्थळ कायदेशीर कारवाई करून सर्व वाहने योग्य व कायदेशीर दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालय अचलपूर येथे जमा केस्याचे सांगण्यात आले.