श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे सहा विद्यार्थी विद्यापीठ गुणवत्ता यादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:13 IST2021-02-14T04:13:33+5:302021-02-14T04:13:33+5:30

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने उन्हाळी २०२० मध्ये डी.वाय.एड. (एक वर्षीय) व बी.पी.ई.एस. (तीन वर्षीय) अभ्यासक्रमाची परीक्षा श्री शिवाजी शारीरिक ...

Six students of Shri Shivaji Physical Education College in University Quality List | श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे सहा विद्यार्थी विद्यापीठ गुणवत्ता यादीत

श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे सहा विद्यार्थी विद्यापीठ गुणवत्ता यादीत

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने उन्हाळी २०२० मध्ये डी.वाय.एड. (एक वर्षीय) व बी.पी.ई.एस. (तीन वर्षीय) अभ्यासक्रमाची परीक्षा श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या ३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत यापैकी सहा जणांनी बाजी मारली, तर २८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. डीवायएडमधून सतीश उपरे, प्रतिभा दाबले व निकिता नवले, तर बीपीईएसमधून निहा भगत, काजल राणी भगत व श्याम झा यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले.

श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, महाविद्यालयाचे पालक अध्यक्ष दिलीप इंगोले, प्राचार्य अंजली ठाकरे, पी.एस. सायर, राजेंद्र डोंगरे, यू.व्ही. देशमुख, सुशांत कुकडे, चेतक शेंडे, शंकर राऊत, नीलेश ठाकरे, स्वाती देशमुख, अमृता गुल्हाने, स्वाती न्याहाटकर, विनोद मसराम, अशोक जगताप, प्रमोद इंगळे, धीरज देशमुख त्यांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले.

Web Title: Six students of Shri Shivaji Physical Education College in University Quality List