कलेक्ट्रेटमधील सहा भंगार वाहनांचा लिलाव रखडला

By Admin | Updated: October 11, 2015 01:32 IST2015-10-11T01:32:25+5:302015-10-11T01:32:25+5:30

राजशिष्टाचाराप्रमाणे मंत्र्यांच्या तसेच अन्य ‘व्हीआयपीं’च्या दौऱ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाल दिव्यांच्या सहा व्हीआयपी कार अनेक दिवसांपासून नादुरुस्त आहेत....

Six scrap vehicles in the collectorate staged auction | कलेक्ट्रेटमधील सहा भंगार वाहनांचा लिलाव रखडला

कलेक्ट्रेटमधील सहा भंगार वाहनांचा लिलाव रखडला

मंत्रालयात प्रस्ताव धूळ खात : ‘राईटआॅफ’ होऊनही निर्णय नाही
संदीप मानकर अमरावती
राजशिष्टाचाराप्रमाणे मंत्र्यांच्या तसेच अन्य ‘व्हीआयपीं’च्या दौऱ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाल दिव्यांच्या सहा व्हीआयपी कार अनेक दिवसांपासून नादुरुस्त आहेत. शासकीय भाषेत त्या ‘राईटआॅफ’ झाल्या आहेत. या वाहना लिलावाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने मंत्रालयात पाठविला आहे. मात्र, त्यावर अद्यापही निर्णय न झाल्याने या प्रस्तावासह नादुरूस्त वाहनांवरही धूळ साचली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘कार पार्किंग’मध्ये लाल दिव्यांच्या चार व साध्या दोन अशा सहा व्हीआयपी कार अनेक दिवसांपासून धूळ खात उभ्या आहेत. ही वाहने २ लाख ६० हजार कि.मी. धावल्याचे मीटरवर नमूद आहे. त्यांचा १० वर्षांचा कालावधीही केव्हाच पूर्ण झाला आहे. त्यामुळे आरटीओंच्या तपासणीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने त्या ‘राईटआॅफ’मध्ये काढल्याचे समजते. प्रोटोकॉल व राजशिष्टाचारानुसार या वाहनांचा उपयोग व्हीआयपींसह मंत्र्यांचे दौरे, राज्यपाल व इतर कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांसाठी केला जात होता. या कारचा प्रस्ताव मंत्रालयात मंजुरी व परवानगीसाठी पाठविण्यात आला आहे. मंजुरीनंतर सदर वाहनांचा लिलाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात येणार आहे.

Web Title: Six scrap vehicles in the collectorate staged auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.