शहरात सहा शाळांना मान्यता नाही
By Admin | Updated: June 13, 2015 00:18 IST2015-06-13T00:18:43+5:302015-06-13T00:18:43+5:30
शासन किंवा महापालिका प्रशासनाची मंजुरी नसताना शहरात राजरोसपणे सुरु असलेल्या शाळा बंद करण्यासाठीचे ...

शहरात सहा शाळांना मान्यता नाही
नोटीस बजावल्या : मान्यता नसल्यास शाळा बंद करण्याचा आयुक्तांचा इशारा
अमरावती : शासन किंवा महापालिका प्रशासनाची मंजुरी नसताना शहरात राजरोसपणे सुरु असलेल्या शाळा बंद करण्यासाठीचे पाऊल आयुक्त गुडेवार यांनी उचलले आहे. त्यानुसार या शाळांच्या संचालकांना नोटीस बजावून मान्यता नसल्यास त्या बंद करा, अन्यथा फौजदारी दाखल करु, असे निर्देश देण्यात आले आहेत.
शासनाच्या नव्या धोरणानुसार कायम विनाअनुदानित शाळा सुरु करायच्या असल्यास त्या शाळांना अटी, शर्तींच्या अधीन राहून परवानगी घेता येते. परंतु शहरात नव्याने प्रवेश प्रक्रिया सुरु झालेल्या शाळांना शासनाची मान्यता नसतानाही त्या बिनदिक्कतपणे विद्यार्थ्यांना प्रवेश देत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. आयुक्त गुडेवार यांना दोन दिवसांपूर्वीे येथील संभाजी ब्रिगेडच्यावतीने निवेदन सादर करुन मान्यता नसलेल्या शाळांपासून पालकांची फसवणूक थांबविण्याची मागणी केली आहे. या निवेदनाच्या आधारेच आयुक्तांनी शाळा निरीक्षक प्रवीण पाटील यांना मान्यताप्राप्त नसलेल्या शाळांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्यात.
या शाळांना बजावली नोटीस
गॉड गिफ्ट स्कूल, वलगाव मार्ग
स्टार इंग्लिश स्कूल, वलगाव मार्ग
विद्यावर्धीनी गुरुकुल देवराज बोथरा स्कूल, महेंद्र कॉलनी
ब्लॉझम इंग्लिश स्कूल, राजापेठ
एसडीएफ इंग्लिश स्कूल, वृंदावन कॉलनी
नारायणा इंग्लिश स्कू ल, एमआयडीसी