सहा दरोडेखोर अटकेत
By Admin | Updated: November 18, 2015 00:19 IST2015-11-18T00:19:41+5:302015-11-18T00:19:41+5:30
शहरातील वाघामाता मंदिराजवळील अतकरे यांच्या घरावर ७ नोव्हेंबरला अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास केला.

सहा दरोडेखोर अटकेत
परतवाड्यातील घटना : आरोपी बुलडाणा जिल्ह्यातील
परतवाडा : शहरातील वाघामाता मंदिराजवळील अतकरे यांच्या घरावर ७ नोव्हेंबरला अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणातील सहा आरोपींना पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी अमरावती येथील गुन्हे शाखेचे तपास पथक तयार करुन तपास सुरू केला होता. सीसीटीव्ही फुटेजवरुन मिळालेल्या माहितीच्या आधारे दरोडेखोर हे बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर व चिखली पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील असल्याचे स्पष्ट झाले. गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा तातडीने शोध घेतला आणि दहिमन बालाजी भोसले, राजेंद्र बालाजी भोसले, कफूर बालाजी भोसले, चुबा बालाजी भोसले, सखाराम बालाजी भोसले (रा. लोणी लव्हाळा), मंजा संतोष पवार (रा.भानखेड) या संशयीत आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीअंती त्यांनी दरोड्याच्या गुन्ह्याची कबुली दिली.
या आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे इतरही मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम, प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक राजा रामसामी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक नीलेश सुरडकर, नागेश चतुरकर, ज्ञानेश्वर सहारे, मुलचंद्र भांबुरकर, सुनील महात्मे आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)