सहा पोलीस कर्मचारी मुख्यालय ‘अटॅच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:14 IST2021-04-08T04:14:41+5:302021-04-08T04:14:41+5:30

अमरावती : दोन दिवसांपूर्वी आयुक्तालयातील सहा कर्मचाऱ्यांच्या भरपूर तक्रारी आल्याने त्यांना पोलीस मुख्यालयाशी ‘अटॅच‘ करण्यात आले ...

Six police personnel headquartered ‘attached | सहा पोलीस कर्मचारी मुख्यालय ‘अटॅच

सहा पोलीस कर्मचारी मुख्यालय ‘अटॅच

अमरावती : दोन दिवसांपूर्वी आयुक्तालयातील सहा कर्मचाऱ्यांच्या भरपूर तक्रारी आल्याने त्यांना पोलीस मुख्यालयाशी ‘अटॅच‘ करण्यात आले आहे. त्यात राजापेठ पोलीस ठाण्याचे तीन, नागपुरी गेटचा एक, फ्रेजरपुरा एक व गुन्हे शाखेच्या एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

पोलीस आयुक्त आरती यांनी शहरातील अवैध धंद्यावर अंकुश लागवण्याकरिता सतत वेगवेगळ्या उपाययोजना आखण्यात येत आहे. स्वतःचे एक विशेष पथक तयार करून शहरातील अवैध धंद्यावर कारवाई सुरू असताना पाहिजे त्याप्रमाणात शहरातील अवैध धंदे बंद होताना दिसत नाही. यामुळे पोलीस आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून माहिती घेतली असता, त्यांना काही कर्मचाऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. तसेच संबंधित कर्मचारी कामात कुचराई करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सहा कर्मचाऱ्यांना तातडीने पोलीस मुख्यालयाशी ‘अटॅच‘ केले आहे.

Web Title: Six police personnel headquartered ‘attached