सांस्कृतिक भवन अपहार प्रकरणी सहा जणांवर फौजदारी

By Admin | Updated: April 28, 2015 00:22 IST2015-04-28T00:22:00+5:302015-04-28T00:22:00+5:30

येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात भाड्याची रक्कम वसूल करुन ती तिजोरीत जमा न करता ...

Six people in criminal housing scam case | सांस्कृतिक भवन अपहार प्रकरणी सहा जणांवर फौजदारी

सांस्कृतिक भवन अपहार प्रकरणी सहा जणांवर फौजदारी

आयुक्तांचे आदेश : २० लाखांची रक्कम झाली होती गहाळ
अमरावती : येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात भाड्याची रक्कम वसूल करुन ती तिजोरीत जमा न करता झालेल्या २० लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी महापालिकेतील सहा कर्मचाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दिले आहेत. पोलिसांत तक्रार करण्याची जबाबदारी उपायुक्तांवर सोपविली आहे. सुटीवरुन परत येताच आयुक्तांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. फौजदारीच्या कारवाईने अन्य कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
तत्कालीन बाजार परवाना अधीक्षक एस. ए. भागवत यांच्यासह आर. एन. वाकपांजर, श्रीराम आगासे, सतीश देशमुख, अनिकेत मिश्रा, पंकज डोनारकर या सहा जणांवर फौजदारी कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. उपायुक्त चंदन पाटील यांनी सोमवारी सामान्य प्रशासन विभागाला सोबत घेत शहर कोतवाली पोलीस ठाण्यात २० लाखांचा अपहार झाल्याप्रकरणी फौजदारी दाखल करण्याची तयारी चालविली होती. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाचा अपहार प्रदीप बाजड यांनी उघडकीस आणला आहे.
सांस्कृतिक भवनाची देखभाल, दुरुस्ती ही यापूर्वी महापालिका प्रशासनाकडे होती. पर्यायाने महापालिकेचा बाजार परवाना विभाग सांस्कृतिक भवनाचे कामकाज बघायचे.
मात्र, १३ जुलै २०११ ते ३१ मार्च २०१२ या दरम्यान सांस्कृतिक भवनात झालेल्या कार्यक्र माच्या नोंदी पुस्तकात घेतल्या नाहीत. परंतु भाड्याची रक्कम वसूल केल्याची बाब तपासादरम्यान उघडकीस आली. वीज रिडींग, चालान पुस्तकात तफावत आढळली असून भाडे वसूल केले असताना त्याचा पावती फाडल्या नाहीत.
अपहार सतत होत असताना याकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्याचे सुद्धा स्पष्ट झाले आहे. विवरणपत्रात भाड्याची रक्कम नमूद नसल्याचे निदर्शनास आले आहे. सांस्कृतिक भवनाच्या अपहाराची चौकशी व्हावी, ही मागणी सदस्यांनी सातत्याने रेटून धरली.

असे आले
अपहार प्रकरण उघडकीस!
संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात अपहार झाल्याचे प्रकरण नगरसेवक प्रदीप बाजड यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. बाजड हे सन- २०१२ मध्ये निवडून आल्यानंतर ते एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सांस्कृतिक भवनात गेले होते. मात्र नाटक, लग्न सोहळे आदी कार्यक्रम झाल्यानंतरही नोंद कोठेही बाजड यांना दिसली नाही. तेव्हा काहीतरी गडबड आहे, ही शंका त्यांना आली. परिणामी बाजड यांनी अपहाराचा विषय प्रारंभी स्थायी समिती त्यानंतर आमसभेत प्रस्तावाच्या रुपाने मांडला.

सांस्कृतिक भवनात अपहार झाल्याप्रकरणीची फाईल सर्वप्रथम पुढे आली तेंव्हा मलाच धक्का बसला. कसा कारभार सुरु होता, याचे आश्चर्य वाटले. ज्यावेळी भाडे वसूल केले नंतर ती रक्कम जमा करण्यात आली नाही, तेंव्हाच हे प्रकरण पोलिसात दिले पाहिजे होते. मात्र, उशिरा का होईना दोषींवर फौजदारी कारवाई होईल.
-चंद्रकांत गुडेवार
आयुक्त, महापालिका

Web Title: Six people in criminal housing scam case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.